गुहागर : भ.क.ल.वालावलकर रुग्णालय डेरवण चिपळूण व साथ चॅरीटेबल ट्रस्ट, वेळणेश्वर यांच्या तर्फे पिवळ्या ,केसरी व पांढऱ्या रेशनकार्ड धारकांसाठी आरोग्य १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तज्ञांच्या तपासणीत शस्त्रक्रिया करण्याची आवशक्यता असल्यास सदरील शस्त्रक्रिया अल्पदारात फेब्रुवारी व मार्च महिन्यात करण्यात येणार आहेत. तरी गुहागर तालुक्यातील गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या शिबिरात हर्निया, अपेंडिक्स, पित्तशयातिलखडे, अल्सर, प्रोस्टेटग्रंथी, मूळव्याध, मुतखडे, चरबीच्या गाठी, थायरॉईड, महीलांच्या गर्भाशय शस्त्रक्रिया, नाक – कान – घसा शस्त्रक्रिया, नाकाचा हाड वाढने, कानाच्या पडद्याची शस्त्रक्रिया, टॉन्सिल्स, मोतिबिन्दु आदी शस्त्रक्रियाबाबत तपासणी आणि आवश्यक असल्यास दिलेल्या कालावधी शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
सदरील आरोग्य तपासणी “विवेकानंदालय” साथ साथ चॅरीटेबल ट्रस्ट, पिंपर रोड, गावराखा व MSEB सब स्टेशन पुढे, वेळणेश्वर, ता. गुहागर येथे होणार आहे. पिंपर फाटा वेळणेश्वर येथुन मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तरी लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी शरद जोशी – 9869459804, 7028129804 ,प्रकाश देवळे – 7767055729 यांच्याकडे स.११:00 ते सं.२ पर्यत संपर्क साधावा.