महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद
गुहागर : स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थान रत्नागिरी व उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान कक्ष पंचायत समीती गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागर तालुक्यातील कोतळूक किरवलेवाडी येथील सभागृहात स्वयंसहाय्यता समूहातील महिलांना स्वयंनिर्भर करण्याकरीता १० दिवशीय भाजीपाला प्रशिक्षण नुकतेच ऊत्साहात संपन्न झाले.
या प्रशिक्षण वर्गात भाजीपाला निर्माण करणे हि काळाची गरज आहे. अशा प्रशिक्षण वर्गामूळे महिलांना नविन तंत्रज्ञान व भाजीपाला निर्मिती करीता विविध पैलूंची माहिती देऊन सेंद्रिय पध्दतीने भाजीपाला लागवड – खते – औषधे निर्माण करणे तसेच क्षेत्रीय भेटी दरम्यान प्रत्यक्ष पहाणीव्दारे कृषी व पिकांबाबतची माहिती देऊन फळबाग लागवडीमध्ये भाजीपाला एक आंतरपिक हि संकल्पना विषद करून एका एकरमध्ये नियोजनबद्ध अनेक पिके कशी घ्यावीत आणि येणारा उत्पादन खर्च कसा कमी करावा याबाबत कृषी अधिकारी श्री. बी. बी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर भाजीपाला लागवडीवरील किड रोग नियंत्रणाच्या पध्दती बाबत आणि भाजीपाला लागवड तंत्र व व्यवस्थापन या अंतर्गत प्रमूख पीक चवळी, मिरची, वांगी, कळींगड, पावटा, कडवा या पिकांबाबत लागवडी पासून काढणी पश्चात तंत्रज्ञान माहिती कृषी सहाय्यक श्री. अविनाश बोऱ्हाडे यांनी दिली. विविध शासकिय योजना बाबत कृषी सहाय्यक श्री. एस. बी. चव्हाण यांनी माहिती दिली. तसेच नैना जाधव यांनी कृषी पूरक व्यवसायाबाबत तर मयूर साळवी यांनी अळंबी व्यवस्थापन , अळंबी लागवड व मार्केटिंग या विषयी मौलीक मार्गर्शन केले.
सांगता समारंभा प्रसंगी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक श्री. एन. डि. पाटिल यांनी महिलांना बँकिंग सेवा या विषयी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षण वर्गाला कोतळूकचे सरपंच सौ. उर्मिला गोरीवले, ग्रामविकास अधिकारी श्री. मोहन घरत, स्टार स्वयंरोजगार केंद्र रत्नागीरीचे संचालक श्री. डि. डि. कानसे, श्री. साबरे, तालुका अभियान कक्षाच्या तालुका व्यवस्थापक श्रीमती रोहिला बोट, पूर्वा ओक , श्री. राकेश हळदणकर, प्रभाग व्यवस्थापक नेहा पवार , समूदाय संधानव्यक्ती नम्रता भेकरे , अंकिता गुरव आदी उपस्थित होते.