गुहागर : सांगली शिक्षण संस्था आयोजित गुणवत्ता शोध परीक्षेत श्रीमती अन्नपूर्णा श्रीधर वैद्य प्राथमिक विद्यालयाची कु. आर्या मंदार गोयथळे हिने २५४ गुण मिळवून केंद्र स्तर गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोना महामारीमुळे या परीक्षेचा निकाल लांबणीवर पडला होता. गुहागर केंद्रातून एक हजार विद्यार्थी या परीक्षेत सहभागी झाले होते. यामध्ये इयत्ता चौथी मधील केंद्रस्तरावर प्रथम आर्या मंदार गोयथळे, द्वितीय रेईशा चौगुले, तृतीय सानवी गोयथळे, चतुर्थ रुद्र जोगळेकर यांनी क्रमांक मिळविले. तर इयत्ता तिसरी मध्ये केंद्रस्तर गुणवत्ता यादीत स्वरा पाटील प्रथम व द्वितीय क्रमांक शंतनू मोरे याने प्राप्त केला. इयत्ता २री मधून केंद्रस्तर गुणवत्ता यादीत साईराज शिंदे प्रथम आला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गुहागर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष महेश भोसले, शालेय समिती अध्यक्ष स्नेहा परचुरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ कळझुणकर, मुख्याध्यापक समीर गुरव, संजय गमरे, सुरेखा शिंदे, प्रणाली बेंडल व सर्व संचालक वर्गांनी अभिनंदन केले.