गुहागर : कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य तालुका शाखा गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्यावतीने राष्ट्रमातांंच्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमानिमित्ताने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा दोन गटात होणार असून इयत्ता पहिली ते पाचवी पहिला गट तर सहावी ते आठवी दुसरा गट असणार आहे.पहिल्या गटासाठी सावित्रीबाई फुले यांचे कार्य हा विषय असून त्यासाठी अडीच मिनिटांचा व्हिडिओ तयार करून मधुरा वैभवकुमार पवार- ८४१२०५३४७६ या नंबर वर पाठवावा तसेच दुसऱ्या गटासाठी राष्ट्रमाता जिजाऊ यांचे कार्य हा विषय असून त्यासाठी चार मिनिटांचा व्हिडिओ तयार करून प्रमोदिनी सुहास गायकवाड- ९४२११००१४६ या नंबर वर पाठवावा.सदर स्पर्धा प्राथमिक शाळेतील पहिली ते आठवीसाठी होणार असून विद्यार्थ्यांनी १५ जानेवारी २०२१ पर्यंत आपले व्हिडिओ पाठवावेत. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र व वाचनीय पुस्तक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.तरी या स्पर्धेत तालुक्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अध्यक्ष सुहास गायकवाड, सचिव प्रकाश गोरे यांनी केले आहे.