• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

मातीला आकार देणाऱ्या कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ

by Manoj Bavdhankar
December 31, 2020
in Old News
16 0
0
मातीला आकार देणाऱ्या कुंभार कुटुंबावर उपासमारीची वेळ
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोरोना आपत्तीमुळे गाडगी, मडकी विक्रीविना 8 महिने पडून

गुहागर : कोरोना आपत्तीच्या कालावधीत  गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील नांदगावकर कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. गेले 8 महिने विक्रीसाठी तयार केलेली शेकडो गाडगी, मडकी तशीच पडून आहेत. रोजगाराची हमी देणारे अन्य साधनच नसल्याने नांदगावकर कुटुंबिय हतबल झाले आहे.
पालपेणे कुंभारवाडीतील उदय नांदगावकर हे आपल्या आईच्या मदतीने आपला पारंपरिक गाडगी, मडकी, माठ, पणत्या, स्वयंपाकाची विविध मातीची भांडी बनवितात. त्यांच्या आजोळची ही परंपरा त्यांच्या आईने सासरी आल्यावर जपली, जोपासली ती आजतागायत. आईच्या मदतीने उदय नांदगावकर यांनी हा पारंपरिक कुंभार व्यवसाय जोपासला आहे.
रुक्मिणी नांदगावकर या वयाच्या 16 व्या वर्षापासून कुंभार व्यवसायात आहेत. आज त्यांचे वय 90 वर्ष असूनदेखील तितक्याच जोमाने आजही त्या फिरत्या चाकावर मातीला आकार देताना दिसून येतात. रुक्मिणी आजीना त्यांचा अपंग मुलगा उदय त्यांना या कामात मदत करतो. मातीची भांडी, चुली, गाडगी, माठ, मडकी बनविण्यासाठी लागणारी माती चिरेखाणीतून खणून आणावी लागते. मातीची वाहतूक व त्यापासून वस्तू बनविण्यासाठी नांदगावकर कुटुंबियाना खूप मेहनत घ्यावी लागते.
एकेकाळी ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान नसताना डोंगरातील बागायतीला पाणी मिळावे म्हणून छोटे छिद्र असलेली मडकी वापरली जायची. उन्हाळ्यात घरोघरी माठ असायचे. नारळी पोफळीच्या बागेला हातरहाटाने पाणी शिंपण्याच्या काळात छोट्या मडक्यांना भाव मिळायचा. परंतू बदलत्या काळात ही परंपरा लोप पावत आहे. आता मातीच्या वस्तु स्वयंपाकघरातून गृहशोभेच्या बनल्या. मातीच्या अशा वस्तूंची मागणी घटली. परंपरागत कुंभार काम बंद पडले. अशा परिस्थितही नांदगावकर कुटुंबियानी आजतागायत ही परंपरा टिकवली. जानेवारी ते एप्रिल या कालावधीत नांदगावकर कुटुंबिय हा आपला मातीच्या वस्तू बनविण्याचा व्यवसाय करतात. या वस्तू विविध ठिकाणी ते विकतात. त्यातून दरवर्षी नांदगावकर कुटुंबियांना किमान 40 हजारांचे उत्पन्न मिळते होते. या उत्पन्नावर नांदगावकर कुटुंबचा उदरनिर्वाह चालतो. मात्र यावर्षी 2020 मध्ये कोरोना आपत्ती आली. टाळेबंदीत त्यांनी तयार केलेल्या मातीची भांडी विक्रिविना पडून राहिली आहेत. त्यामुळे केवळ या उत्पन्नावरच अवलंबून असलेल्या नांदगावकर कुटुंबियांवर गेले 9 महिने उपासमारीची वेळ आली आहे.
दरम्यान, उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाल्याने व दोन लहान मुलांच्या शिक्षणाचा खर्च असल्याने उदय नांदगावकर यांच्या पत्नीने मुंबई गाठून  ओळखीने एका ठिकाणी घर मोलकरीण म्हणून काम स्वीकारले आहे. उदय नांदगावकर यांचा एक भाऊ त्याच्या सासरवाडीत रहातो. त्यामुळे पायाने अपंग असलेल्या उदय यांच्यावरच संपूर्ण कुटुंबाचा भार आहे. घरात 90 वर्षांची आई, दोन मुले तर पत्नी मुंबईत मोलकरीण अशा काहीशा विचित्र अवस्थेत  सापडले आहेत.

Tags: GuhagarGuhagar NewsLocal NewsMarathi NewsNews in GuhagarPotterTop newsकुंभारगुहागरगुहागर न्युजटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.