गुहागर : गुहागर तालुक्यात होणाऱ्या २९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यामध्ये साखळी बुद्रुक व पालपेणेसाठी पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी रोहनकुमार चोथे, पेवे व खामशेतसाठी पंचायत समिती सहाय्यक लेखाधिकारी डी. डी. पालकर, तळवली व निगुंडळ साठी मंडळ कृषी अधिकारी भक्ती यादव, रानवीसाठी पंचायत समिती कनिष्ठ प्रशासन अधिकारी एस. एम. चप्पलवर, कोळवली व कोसबी वाडीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियांत्रिकी सहाय्यक ऐन. ए. माळी, मळण व कुडलीसाठी मंडळ अधिकारी व्ही. व्ही. माने, उमरठ व काताळे साठी पंचायत समिती विस्तार अधिकारी आर. के. धायगुडे, पडवेसाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी एस. ए. कांबळे, गोळेवाडी व भातगावसाठी मंडळ अधिकारी एस. पी. गवळी, शिवणे व काजुर्लीसाठी कृषी पर्यवेक्षक भीमाशंकर कोळी, शीरसाठी जिल्हा परिषद बांधकाम कनिष्ठ अभियंता वैभव चौधरी, मासुसाठी मंडळा अधिकारी एस. एफ. साळुंखे, जामसुत व पिंपर साठी पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासन अधिकारी व्ही. एस. कदम, गिमवी व मुंढर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मंदार छत्रे, अडूरसाठी पंचायत समिती विस्तार अधिकारी पी. पी. केळकर, वेळणेश्वरसाठी विस्तार अधिकारी एस. एस. कांबळे, कोंड करूळसाठी कृषी अधिकारी भरत चव्हाण आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.