• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
17 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

काजुर्लीच्या श्री जुगाई देवस्थान ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

by Ganesh Dhanawade
December 19, 2020
in Old News
16 0
0
काजुर्लीच्या श्री जुगाई देवस्थान ट्रस्टच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : श्री जुगाई देवस्थान ट्रस्ट काजुर्ली (ता.गुहागर) यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन श्री जुगाई देवी मंदिरात माजी अध्यक्ष डॉ.आनंद जोशी व अध्यक्ष सुधाकर गोणबरे यांच्या हस्ते करण्यात आले. 
दिनदर्शिका प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक अमोल पवार यांनी केले. दिनदर्शिका तयार करण्यासाठी विश्वस्त समितीचे अध्यक्ष, पदाधिकारी , ग्रामस्थ यांनी मेहनत घेतल्याचे सांगून सर्व जाहिरातदार, मुद्रक संदेश जोशी यांनी केलेल्या सहकर्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. उद्घाटक आनंद जोशी यांनी उपक्रमाचे कौतुक केले तसेच नवनवीन उपक्रम हाती घेण्याचे आवाहन केले.अध्यक्ष सुधाकर गोणबरे यांनी ही दिनदर्शिका तयार करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. गावातील सण समारंभ, उत्सव यांची माहिती सर्व ग्रामस्थांना मिळावी, सामाजिक उपक्रमात जनतेचा सहभाग वाढावा यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला असे सांगितले.मुद्रक संदेश जोशी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री जुगाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुधाकर गोणबरे, माजी अध्यक्ष आनंद जोशी, उपाध्यक्ष संतोष साळवी, सचिव जगदीश साळवी, खजिनदार मोतीराम गुरव,सदस्य प्रशांत साळवी, प्रदीप साळवी, दत्ताराम जगताप, विजय वेलोंडे, यशवंत पवार, नंदकुमार धांगडे, गुणाजी गोणबरे,बाळकृष्ण राणे आदी मान्यवर उपस्थित होते. अमोल पवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यावेळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarउत्सवटॉप न्युजताज्या बातम्यादिनदर्शिकामराठी बातम्यालोकल न्युजश्री जुगाई देवस्थान ट्रस्टसणसमारंभ
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.