गुहागर : राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसच्या राज्यातील सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या जिल्हाध्यक्षांचा यादीत रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष साहिल आरेकर यांची निवड झाल्याबद्दल गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुहागर तालुकाध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर, नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, श्री. प्रदीप बेंडल, जिल्हा सरचिटणीस श्री. विजय मोहिते, विधानसभा उपाध्यक्ष श्री. दीपक जाधव, शहराध्यक्ष श्री. मंदार कचरेकर, युवक तालुका अध्यक्ष, श्री. गौरव वेल्हाळ, श्री. वैभव आदवडे , माजी सभापती सौ.संपदाताई गडदे, उपनगराध्यक्ष सौ. स्नेहाताई भागडे, नगरसेविका सौ. सुजाता बागकर, शृंगारतळी शहराध्यक्ष श्री.अजित बेलवलकर, माजी उपनगराध्यक्ष श्री. नरेश पवार, विद्यार्थी शहराध्यक्ष श्री. रोहित मालप,उपशहराध्यक्ष श्री.शशांक बागकर,उपशहराध्यक्ष श्री.सौरभ भागडे, तालुका सरचिटणीस श्री. प्रसाद विचारे, हर्ष बागकर, आयुष कदम, प्रथमेश घाडे, द्वीप कचरेकर आदी उपस्थित होते.