• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन उत्साहात संपन्न

by Ganesh Dhanawade
December 9, 2020
in Old News
17 0
0
जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन उत्साहात संपन्न
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप 

गुहागर : गुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थेच्या वतीने वरवेली येथील संस्थेच्या कार्यालयामध्ये जागतिक दिव्यांग सहाय्यता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील दिव्यांगांना कृत्रिम साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील प्रगतशील दिव्यांग व्यवसायिक मंगेश महाडिक, संस्थेचे सल्लागार प्रकाश बापट, सरपंच पुनम रावणंग, सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण, संदीप भाटकर, संस्थेचे सर्व कार्यकारी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष उदय रावणंग यांनी आपल्या प्रास्ताविकात जागतिक दिव्यांग दिनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच दिव्यांगांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.
यावेळी बोलताना मंगेश महाडीक यांनी दिव्यांगांना खचून न जाता स्वतःच्या पायावर उभे राहायला हवे. याबाबत त्यांनी त्यांच्या काजू प्रोसेसिंग युनिट व कुक्कुट पालन याविषयी सविस्तर माहिती करून दिली. प्रकाश बापट यांनी सर्व प्रकारच्या दिव्यांगाना जगातील विविध उदाहरणे देऊन आपण कसे अपंगत्वावर मात करू शकतो हे पटवून दिले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून यूटिलिटी पावर टेक प्रा. लि. अंजनवेल या कंपनीने दिव्यांगांसाठी दिलेल्या  वॉकर, व्हीलचेअर, कुबड्या व काठी या कृत्रिम साहित्याचे वाटप गरजू दिव्यांगांना करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रकाश अनगुडे यांनी तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस सुनिल रांजणे, खजिनदार प्रवीण मोहिते, सानिका रांजाणे, अनिल जोशी, संतोष कदम, संगम रावणंग, उल्हास विचारे यांनी विशेष प्रयत्न केले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarकाजू प्रोसेसिंग युनिटकुक्कुट पालनगुहागर तालुका अपंग पुनर्वसन संस्थाजागतिक दिव्यांग सहाय्यता दिनटॉप न्युजताज्या बातम्यामंगेश महाडीकमराठी बातम्यायूटिलिटी पावर टेक प्रा. लि. अंजनवेललोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.