• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली – परचुरी रस्त्याचे आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते भूमिपूजन

by Ganesh Dhanawade
December 6, 2020
in Old News
16 1
0
तळवली – परचुरी रस्त्याचे आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते भूमिपूजन
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांचे देखील उद्घाटन

गुहागर : गेले अनेक वर्ष  दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या तालुक्यातील तळवली-परचुरी रस्त्याचे भूमिपूजन आम. भास्कर जाधव यांच्याहस्ते नुकतेच पार पडले. तसेच आम. भास्कर जाधव आणि जि. प. सदस्य विक्रांत जाधव यांच्या निधीतून मंजूर झालेल्या प्रा. मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या दोन वर्गखोल्यांचे उद्घाटन देखील यावेळी पार पडले.
गुहागर तालुक्यातील तळवली-परचुरी रस्ता गेले अनेक वर्षे दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. पावसाळ्यात पडणाऱ्या खड्यांमुळे येथून वाहन चालविणे कसरतीचे बनले होते. तर खड्यांमुळे याठिकाणी काही अपघात देखील घडले होते. या मार्गावरील सुमारे २ कि. मी. अंतराच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम.भास्कर जाधव यांच्या प्रयत्नातून सुमारे २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन नुकतेच आम.जाधव यांच्याहस्ते पार पडले. या रस्त्याच्या कामामुळे आता वाहनचालकांचे हाल काही प्रमाणात कमी होणार आहेत. या रस्त्याच्या भूमिपूजन कामासाठी सभापती विभावरी मुळे, जि. प.सदस्य विक्रांत जाधव,उपसभापती सुनील पवार,सामाजिक कार्यकर्ते विनायक मुळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्गखोल्यांच्या निकृष्ट बांधकामाबत अधिकारी वर्ग धारेवर

प्रा.मराठी शाळा तळवली आगरवाडीच्या नवीन वर्गखोल्यांबाबत आम.भास्कर जाधव यांनी नाराजी व्यक्त करत बांधकामाबाबत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.वर्गखोल्यांचे काम अतिशय निकृष्ट झाले असून निधीच्या प्रमाणात हे काम झाले नसल्याबाबत त्यांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsMLA Bhaskar JadhavNews in Guhagarshivsenaआमदार भास्कर जाधवटॉप न्युजतळवली-परचुरीताज्या बातम्याप्राथमिक मराठी शाळाभास्कर जाधवभूमिपूजनमराठी बातम्यालोकल न्युजविक्रांत जाधवविभावरी मुळेशिवसेनासार्वजनिक बांधकाम शाखा अभियंतासुनील पवार
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.