• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आबलोली येथे नोकरी मदत केंद्राचे उद्घाटन

by Ganesh Dhanawade
November 25, 2020
in Old News
17 0
0
आबलोली येथे नोकरी मदत केंद्राचे उद्घाटन
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली असून शिक्षीत युवा वर्गाला योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. ग्रामीण भागातील युवा वर्गाला नोकरी विषयक योग्य ती माहिती व मार्गदर्शन मिळावे या हेतूने गुहागर तालुक्यातील आबलोली येथील मातोश्री काॅम्प्यूटर्स व वक्रांगी केंद्र आबलोलीचे संचालक नरेश निमुणकर यांनी सुरेटा नोकरी मदत केंद्र सुरु केले आहे.
नोकरी मदत केंद्रामध्ये आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या उपलब्धतेनुसार माहिती संदेश, प्रवेश प्रक्रिया, परीक्षा विषयक माहिती तसेच संबंधित पदाबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.  गुहागर तालुका परीसरातील बेरोजगार युवक-युवतींनी या नोकरी मदत केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक नरेश निमुणकर यांनी केले आहे.
नोकरी मदत केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पंचायत समिती सदस्या पूर्वी निमुणकर, खोडदे सरपंच प्रदीप मोहिते, आंबेरे सरपंच रवींद्र अवेरे, माजी सरपंच तेजस केंबळे, नरेश निमुणकर, विशाल नेटके, प्रथमेश निमुणकर, नकुल भंडारी, सुनिता निमुणकर आदी मान्यवर उपस्थित होते. संचालिका नम्रता निमुणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarटॉप न्युजताज्या बातम्यानोकरी मदत केंद्रपंचायत समितीमराठी बातम्यामातोश्री काॅम्प्यूटर्सलोकल न्युजवक्रांगी केंद्रसुरेटा नोकरी मदत केंद्र
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.