साडेचार लाख रुपये खर्चून तयार केला पर्यायी मार्ग; रस्त्या लोकार्पण
गुहागर : तालुक्यातील वरवेली येथील मराठवाडी ग्रामस्थांनी सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करून मोडकाआगर पुलाला पर्यायी मार्ग तयार करून सर्वांचा त्रास वाचविला आहे. केलेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा वरवेली ग्रामपंचायत सरपंच पूनम रावणांग यांच्या हस्ते फीत कापून तर माजी सरपंच गणपत विचारे व श्री हसलाई देवी देवस्थान अध्यक्ष वसंत विचारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी विचारे,चंद्रशेखर विचारे, दादा विचारे, दिलीप विचारे, प्रल्हाद (गुंडा) विचारे, सिध्दीविनायक मंडळ अध्यक्ष आशिष विचारे, गणेश किर्वे, प्रसाद विचारे, रणजित शिंदे, दीपक विचारे, अरविंद विचारे, संतोष देसाई, राहुल शिंदे, अरुण विचारे, रविकांत विचारे, जितेंद्र विचारे, विलास विचारे, कुणाल देसाई, रतिष शिंदे, उदय पवार, शाम नारकर, गोपीनाथ कीर्वे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दीड वर्षापूर्वी मोडकाआगर पुल वाहतुकीस धोकादायक असल्याचे कारण देऊन येथून वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे येथून प्रवास करणारे हजारो प्रवाशांना रानवी, पवारसाखरी, पालपेणे असा साधारणतः २५ कि. मी. चा वळसा घेऊन शृंगारतळी येथे जावे लागत होते. गेली दीड वर्ष संबधित ठेकेदार व लोकप्रतिनिधी याना पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. परंतु, गेल्या दीड वर्षामध्ये ढुंकूनही या मागणीकडे कुणीच लक्ष दिले नाही.
मार्च महिन्यात वरवेली येथील ग्रामस्थ प्रल्हाद ऊर्फ गुंडा विचारे यांनी वरवेली धरणाच्या बाजूने रस्ता स्वखर्चाने रस्ता तयार केला होता. पण पावसाळ्यात धरण तुडूंब भरल्याने तोही मार्ग बंद झाला. त्यानंतर तेलीवाडी मार्गे पर्यायी व्यवस्था ग्रामस्थांनी केला. तोही रस्ता अरुंद व धोकादायक असल्याने येथे सतत छोटे छोटे अपघात घडत गेले. वाहनचालक व प्रवाशी यांची होणारी गैरसोय लक्षात घेत वरवेली मराठवाडी ग्रामस्थांनी पर्यायी रस्ता तयार करण्याचे ठरविले. शासनाचा एक रुपयाचा निधी न घेता जमीन मालकांना संपर्क साधून तसेच अनेकांचे सहकार्य घेऊन सदरचा रस्ता अंदाजे साडेचार लाख हून अधिक रुपये खर्च करून तयार केला व तो रस्ता आज छोट्या वाहनासाठी वाहतुकीस खुला करण्यात आला आहे.
मराठवाडी ग्रामस्थांनी केलेल्या योगदानाचे सरपंच पूनम रावणांग यानी भरभरून कौतुक केले. तसेच तालुक्यातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. या कार्यक्रमानिमित्त जमीनमालक तसेच रस्त्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचा सत्कार सोहळा दिलीप विचारे यांच्या निवासस्थानी करण्यात आला. जमीन मालकांमध्ये सुरेंद्र विचारे, गणपत विचारे, दिलीप विचारे, संदिप विचारे, अरविंद विचारे, उदय विचारे, विलास विचारे, दीपक विचारे, चंद्रशेखर विचारे, नारायण विचारे, वसंत विचारे, सुधीर विचारे, उदयराव विचारे, जितेंद्र विचारे, राजेश विचारे, क्षितिज शिंदे, श्री. कुंटे, शेखर विचारे, श्रीधर विचारे, श्री. जोशी, नरेश करंदेकर, विजय रसाळ, जयसिंग शिंदे, शाम नारकर, वैभव पवार, दीपक परचुरे आदींची जमीन या पर्यायी मार्गासाठी गेली आहे.