• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
12 May 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक

by Ganesh Dhanawade
November 13, 2020
in Old News
16 1
0
बँकेत बनावट सोने ठेऊन १४ लाख ६३ हजाराची फसवणूक
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

वेलदुरच्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखेतील प्रकार

गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदुर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूर शाखेत नेमलेल्या बँकेच्या सराफाने संगनमत करून बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ९ जणांविरुद्ध गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विदर्भ कोकण बँकेचे वेलदुर शाखेचे मॅनेजर मकरंद पत्की यांनी गुहागर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी संजय फुणगुसकर हा बँकेत सराफाचे काम पाहत होता. त्याने मिलिंद जाधव, मनोहर घुमे, गणेश कोळथरकर, सुलोचना पावसकर, शबीया परबुलकर, विक्रांत दाभोळकर, राजेश भोसले, विनया दाभोळकर यांचे सोन्याचे खोटे दागिने खरे दाखवून तसेच ते खरे असल्याचे खोटे मूल्यांकन केले. हे खोटे दागिने खरे दागिने दाखवून बँकेकडे गहाण ठेवून वरील सर्व आरोपीनी दि. ५ जुलै २०१९ ते १७ जुलै २०२० या कालावधीत बँकेची १४ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे बँकेचे आर्थिक नुकसान झाले व बँकेची फसवणूक झाली आहे. संजय फुणगुसकर याने काही सप्टेंबर महिन्यात  याच बँकेतील  शाखा व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गुळे यांचा पैशाच्या हव्यासापोटी खून केला होता. या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. सदरील प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Tags: Crime NewsGuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarगुन्हे बातम्यागुहागर पोलीस स्थानकटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजविदर्भ कोकण ग्रामीण बँक वेलदूरवेलदुर
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.