सचिवपदी निलेश सुर्वे यांची निवड
गुहागर : काही दिवसांपूर्वीच ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गुहागर तहसील कार्यालयावर यशस्वी मोर्चा काढल्यानंतर या मागण्यांचा पाठपुरावा व याबाबत समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी नुकत्याच झालेल्या ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या बैठकीत समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते पांडुरंग पाते यांची तर सचिवपदी नीलेश सुर्वे यांची निवड करण्यात आली.
निवडण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये उपाध्यक्षपदी नंदकिशोर रोहिलकर, दीपक पालशेतकर, अरविंद पालकर, शशिकांत पवार, सचिवपदी संतोष सोलकर, वैभव आदवडे, नरेश निमकर, खजिनदारपदी निलेश मोरे, सहखजिनदार पदी संजय पवार, कार्यकारणी सदस्य तुकाराम निवाते, महादेव साटले, नवनीत ठाकूर, सुजाता बागकर, वनिता डिंगणकर, मनोहर लांजेकर, मंगेश मोरे, संतोष गुरव, नरेश पवार, आशिष भोसले, सुधीर कदम, मुकुंद पानवलकर, चंद्रकांत चांदोरकर, राजेंद्र काताळकर, प्रकाश कारेकर, विनायक काणेकर, सुनील नाटुस्कर, वासुदेव पांचाळ, संतोष धामणकर, अजित साळवी, रमेश नेटके, गौरव वेल्हाळ, नंदू बारटक्के, महेंद्र खडपेकर, मधुकर कावणकर, सल्लागार म्हणून कृष्णा वणे, रामचंद्र हुमणे, गंगाराम पाष्ठे, राजेश बेंडल, महेश नाटेकर, संतोष जैतपकर, नेत्रा ठाकूर, पुनम पाष्ठे, भरत शेटे, विलास वाघे, दत्तराम निकम, सचिन बाईत, विलास गुरव, चंद्रकांत पागडे, प्रदीप बेंडल, विजय वैद्य तर माहिती व प्रसारण समितीमध्ये नीलेश सूर्वे, मनोज बावधनकर, नरेश पोळेकर, अमोल पवार, प्रदीप चव्हाण, रवींद्र कुळे, गणेश धनावडे, पराग कांबळे आदींची निवड करण्यात आली आहे.