• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
16 June 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली

by Ganesh Dhanawade
November 5, 2020
in Old News
18 1
0
पालशेत समुद्रात मच्छीमार बोट बुडाली
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर : समुद्रातील खराब हवामानामुळे गेली दोन महिने जयगड येथे अडकलेली नौका मुंबईच्या दिशेने जात असताना पालशेत समुद्रात बुडाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली. मात्र या दुर्घटनेतील सर्व खलाशी सुखरूप आहेत.
जयगड येथून मुंबईकडे जाणारी श्री सोमनाथ नावाची मच्छीमार बोट पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास पालशेत समुद्रात बुडाली. या बोटीवरील ६ खलाशी व १ तांडेल यांनी बोट वाचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र नाईलाज झाल्याने समुद्रात उड्या टाकत त्यांनी आपला जीव वाचवला. तब्बल दोन तासांनी ते किनान्यावर सुखरूप पोहोचले. समुद्रातील वादळाच्यावेळी मुंबईतील श्री सोमनाथ ही मच्छीमारी नौका जयगड किनाऱ्यावर येऊन पोहोचली होती. गेले दोन महिने याच परिसरात ही नौका मच्छीमारी करत होती. ही नौका काल मुंबईच्या दिशेने निघाली होती. पालशेत बंदर परिसरातून ही नौका पुढे जात असताना पहाटे ४.३० वा.च्या सुमारास बोटीत पाणी भरू लागले. संकट ओळखून तांडेलने नौका वेगाने किनाऱ्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाणी वाढतच गेले. अखेर पालशेत बंदरापासून ४ वाव खोल समुद्रात बोट बुडाली. बोट आता बोट वाचणार नाही हे लक्षात येताच ६ खलाशांसह तांडेलांनी समुद्रात उडी घेतली. सकाळी ६.३० पोहोचले. पोलिसांना याबाबतचे वृत्त मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यात यश आले नाही. दुर्घटनेत बोटोचे पूर्णत: नुकसान झाले आहे.
मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी देसाई याप्रकरणात अधिक तपास करीत आहेत. या बोटीचे मालक नितीन नथुराम मोंडे हे मुंबईतील आहेत. बोटीवर राहूल संतोष दाभोळकर हे तांडेल म्हणून काम करत होते. तर अक्षय संतोष दाभोळकर, समीर संतोष दाभोळकर, सूर्यकांत शंकर भाटकर, जगदीश जगन्नाथ चिवेलकर,भरत लक्ष्मण भोमे, हरेश शंकर पाचकुडे अशी मच्छीमारांची नावे आहेत.

Tags: GuhagarGuhagar NewsMarathi NewsNews in Guhagarजयगडटॉप न्युजताज्या बातम्यापालशेतमराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.