गुहागर : महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या गुहागर तालुकाध्यक्षपदी अमोल धुमाळ यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या उपाध्यक्षपदी प्रदिप पडवाळ, सागर भडंगे, कार्याध्यक्षपदी महेश आंधळे, कोषाध्यक्षपदी ईश्वर घनवटे, सरचिटणीस पदी राहुल आमटे तर प्रमुख सल्लागार पदी बाबासाहेब राशिनकर दिपक साबळे, साजिद मुकादम, डी . के. राठोड, विष्णू राठोड, जिल्हा प्रतिनिधी पदी शिवराम अंकुलगे, इमाम पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे तालुका संपर्कप्रमुख म्हणून प्रभू हंबर्डे, शारीक महम्मद जफर, सहचिटणीस धनंजय डिसले, पांडुरंग फड, गणेश रोडे, जुनैद शेख, प्रसिध्दी प्रमुख म्हणून ईश्वर हलगरे, शिवाजी गायकवाड, प्रमुख प्रवक्ता आण्णासाहेब शिंदे, धनपालसिंग राजपूत यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या महिला प्रतिनिधी पदी सौ. निशिगंधा भुते, श्रीम. अंजली सुरवसे, तालुका संघटक पदी भास्कर गावडे, अजय खेराडे यांची तर बीट संघटक म्हणुन अवधूत राऊतराव, गणेश डुबे, नितीन खाडिलकर, संजय राठोड यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.