गुहागर : गुहागर तालुका नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी वेळणेश्वर गावचे माजी तंटामुक्त अध्यक्ष, श्री स्वयंभू विकास मंडळ वेळणेश्वर अध्यक्ष व पत्रकार उमेश शिंदे यांची निवड करण्यात आली.
नवरात्र उत्सवासंदर्भात गुहागर येथील महापुरुष मंदिरात तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला तालुक्यातील ४५ नवरात्र उत्सव मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते. या सभेला मार्गदर्शक म्हणून गुहागर पोलिस निरीक्षक अरविंद बोडके , सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव, संतोष साळसकर उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक अरविंद बोडके यांनी सांगितले की, नवरात्र उत्सव साजरा करताना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, भाविकांच्या गर्दीवर नियत्रंण ठेवणे मंडळाची जबाबदारी आहे, नवरात्र उत्सवाच्या सामाजिक उपक्रम, आरोग्य शिबिरे घेण्यात यावी, तसेच उपस्थित भाविकांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील. तसेच शारिरीक अंतर ठेवणें गरजेचे आहे. कार्यक्रमात कुठचाही तंटा होणार नाही याची खबरदारी मंडळांनी घ्यावी, तालुक्यातील सर्वच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी उत्सव साजरा करताना शासनाच्या सूचनांचे पालन करूनच उत्सव साजरे करण्यात येईल अशी ग्वाही दिली. यावेळी तालुका मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष उमेश शिंदे,(वेळणेश्वर), उपाध्यक्षपदी सचिन घाणेकर,(वेलदुर), रमेश पांचाळ (आबलोली ), अजय आरेकर , (असगोली) सचिवपदी दैवत जाक्कर, (पालशेत) सहसचिव प्रकाश आग्रे (मळण) यांची निवड करण्यात आली. सदर समितीने तालुक्यातील सर्व नवरात्र उत्सवावर नियंत्रण ठेवायचे आहे,तसेच शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन योग्य प्रकारे करून घ्यायचे आहे.
[bsa_pro_ad_space id=3]