तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण मार्गावर बस सुरू
गुहागर : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसह इतर मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप सुरु आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे निलंबन देखील करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी २५ रोजी सांगितले होते. तर जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत कर्मचारी सेवेत हजर होणार नाहीत, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. असे असताना शनिवारी गुहागर आगारातील विलीनीकरण मुद्द्यावर ठाम असलेल्या ३५४ कर्मचाऱ्यांपैकी ९ कर्मचारी सेवेत रुजू झाले. गुहागर आगारातून तब्बल २० दिवसानंतर गुहागर- चिपळूण बस सोडण्यात आली. शृंगारतळीत बस आल्यावर प्रवाशांनी गर्दी केली. ग्रामस्थांनी एसटी कर्मचारी यांचे पुष्प देऊन स्वागत केले आणि गाडीला हार घालण्यात आला.
Employees will not be in service until the demand is met, This is what the holy staff has taken. Meanwhile, out of 354 employees who were adamant on the merger issue at Guhagar depot on Saturday, 9 employees joined the service.
मंगळवारी तीन चालक सेवेत हजर झाल्याने चिपळूण मार्गावर तीन फेऱ्या सोडण्यात आल्या. गुहागरला आजही अनेक कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम असून जो पर्यंत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा पवित्रा अनेक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. याबत बोलताना आगार प्रमुख वैभव कांबळे म्हणाले, आज परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानुसार आगारातील ९ कर्मचारी सेवेत रुजू झाले आहेत. त्यामध्ये ३ चालक, ३ पर्यवेक्षक, १ वाहतूक निरीक्षक, १ शिपाई, १ कार्यशाळा कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. उद्यापासून आणखी कर्मचारी वाढतील. आणखी कर्मचारी कामावर येण्यास इच्छुक आहेत. मंत्री महोदयांनी पगार वाढ चांगली दिली आहे. त्याचा आदर ठेऊन प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण यांना सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
गेली २० दिवसात ५ हजार २०० फेऱ्या रद्द होऊन गुहागर आगाराचे एक कोटी ६० लाखाचे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसात गुहागर आगारातून बस सेवा पूर्ववत होईल, असा विश्वास श्री. कांबळे यांनी व्यक्त केला.