गुहागर, ता. 15 : (Guhagar) तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये 61.32 टक्के मतदान झाले आहे. 19 हजार 951 मतदारांपैकी 12 हजार 233 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान अडूर प्रभाग १ मध्ये (77.94 टक्के) झाले. तर पडवे प्रभाग 2 मध्ये सर्वात कमी (41.10 टक्के) मतदान झाले.
गुहागर 16 ग्रामपंचायतींच्या (Grampanchyat Election) 38 प्रभागांमधील 68 जागांसाठी आज 43 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया (Voting) शांततेत पार पडली. 168 उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. सकाळच्या वेळात मतदानाचे कर्तव्य पार पाडण्यावर मतदारांनी भर दिला. त्यामुळे सकाळ पर्यंत मतदानाने 40 टक्केचा टप्पा ओलांडला होता. दुपारी 3.30 पर्यंत यात 15 टक्के मतदानाची भर पडली. 56 टक्के मतदान झाले. तर मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात केवळ 5 टक्के भर पडली. मतदानाची वेळ संपली तेव्हा तालुक्यात 61.32 टक्के मतदान झाले.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी काताळे येथे, पंचायत समितीच्या सभापती सौ. विभावरी मुळे यांनी तळवलीमध्ये, याशिवाय सिताराम ठोंबरे, पांडुरंग कापले या पंचायत समिती सदस्यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
ग्रामपंचायतींचे प्रभाग निहाय झालेले मतदान
तळवली प्रभाग १ – 75.29 %, तळवली प्रभाग २ – 61.83%, तळवली प्रभाग ३ – 73.28%,
निगुंडळ प्रभाग १ – 75.07%,
भातगांव प्रभाग ३- 55.83%,
कोंडकारुळ प्रभाग २ – 46.94%, कोंडकारुळ प्रभाग ३ – 46.94%, कोंडकारुळ प्रभाग ४ – 61.79%,
अडूर प्रभाग १ – 77.94%, अडूर प्रभाग ३ – 60.54%, अडूर प्रभाग ४ – 63.70%,
काजुर्ली प्रभाग १ – 77.26 %, काजुर्ली प्रभाग २- 65.59%, काजुर्ली प्रभाग ३- 58.70%
कुडली प्रभाग १ – 60.57%, कुडली प्रभाग ३/१ – 58.82%, कुडली प्रभाग ३/2 – 57.60%,
पडवे प्रभाग १ – 49.46%, पडवे प्रभाग २ –47.99%, पडवे प्रभाग ३ –41.10%, पडवे प्रभाग ४ –57.64%,
मासु प्रभाग १ – 71.37%, मासु प्रभाग २ – 64.53%, मासु प्रभाग ३ – 54.72%,
मुंढर प्रभाग १ – 76.26%, मुंढर प्रभाग २ – 67.93%,
साखरी बुद्रुक प्रभाग २ – 61.54%,
काताळे प्रभाग १ /१ – 68.81%, काताळे प्रभाग १ /२ – 59.09%,
काताळे प्रभाग २/१ – 55.09%, काताळे प्रभाग २ /२ – 50.20%,
काताळे प्रभाग ३/१ – 55.07%, काताळे प्रभाग 3/२ – 70.56%,
खामशेत प्रभाग १ – 69.80%, खामशेत प्रभाग २ – 64.76%, खामशेत प्रभाग ३ – 69.02%,
मळण प्रभाग ३ – 56.30%,
शिर प्रभाग १ – 55.50%, शिर प्रभाग २ – 55.11%,
गिमवी प्रभाग १ – 73.69%,
गिमवी प्रभाग २/१- 68.63%, गिमवी प्रभाग २/२- 61.31%,
गिमवी प्रभाग ३ – 69.21%