शिवसेना तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांची जीवावर उद्धार होऊन मदत
गुहागर : चिपळूण येथील पुरामुळे अडकून पडलेल्या मुंबईतील 32 गुहागरवासियांना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिनशेठ बाईत यांनी वाहनाची व्यवस्था करून सर्व प्रवाशांना सुखरूप जागी आणून सर्वांना एसटी बसने त्यांच्या गावात आणून सोडले. तालुकाप्रमुख बाईत यांच्या या मदतीचे मुंबईकर चाकरमान्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
Shiv Sena’s taluka chief Sachin Sheth Bait arranged a vehicle for the 32 Guhagar residents of Mumbai who were stranded due to the floods in Chiplun. Mumbaikar Chakarmanya has thanked the taluka chief Bait for his help.
चिपळूण तालुक्यात 22 जुलै रोजी आलेल्या पुराने हाहाकार उडाला आहे. या पूरस्थितीमुळे चिपळूण मधील वाशिष्टी नदीवरील पूल व उक्ताड फरशी पूल हे दोन्ही पूल निकामी झाल्यामुळे त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली. दोन्ही पूल खचले असल्याने मुंबई गोव्याकडून येणाऱ्या प्रवाशी ट्रॅव्हल्स व इतर वाहने परशुराम पायथ्याशी येऊन थांबली होती. त्यामध्ये गुहागर तालुक्यातील काजूर्ली, भातगाव, शिवणे, कोळवली, आंबेरे, गोणबरे वाडी, जांभारी, पाचेरी, शृंगारतळी, धोपावे आणि अंजनवेल मधील ३२ प्रवाशी अडकलेले होते. तब्बल 24 तासाच्या प्रतीक्षेनंतरही त्यांच्यापर्यंत कोणीही पोहोचलेले नव्हते. दरम्यान, ही घटना शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत यांना कळली. त्यांनी क्षणाचाही विचार न करता स्वतःचा जीव धोक्यात घालून नुकताच मोडलेला एन्रॉन पूल त्या ठिकाणी पोहोचले. त्याठिकाणी जाण्यासाठी पाऊण तास चालावे लागले. यावेळी तेथील काय परिस्थिती आहे याची माहिती प्रशांत ट्रॅव्हल्सचे ड्रायव्हर श्री. राजा झोरे यांनी बाईत याना दिली. अडकलेल्या सर्व प्रवाशांना घेऊन सचिन बाईत यांनी स्वतःच्या गाडीने डीवायएसपी कार्यालयापर्यंत आणले. तिथून सर्वांना एसटी बसने आपापल्या घरी सुखरूप पाठवले.
तसेच सदर अडकलेल्या व्यक्तीमध्ये लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींचा समावेश होता. सर्व मुंबई पुण्यावरून तीन दिवसांपूर्वी आल्याने उपाशी पोटी होते. त्यांना बाईत यांनी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. यावेळी एसटी बसमध्ये बसताना सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून तालुकाप्रमुख सचिन बाईत भावुक झाले. त्यांच्या सोबत ऋषिकेश बाईत, शुभम बाईत, पपु दिवटे, ऋषिल निमुणकर आदी सहकारी होते.