राज्याध्यक्ष अनघा वैद्य यांचे प्रतिपादन
गुहागर : आफ्रोह(Afroh) महिला आघाडी आपले कार्य करताना स्थानिक पातळीवरच्या महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देईल. तसेच महिला व त्यांचे हक्काचे भंग होणार नाही या बाबतीत लक्ष घालेल, असे प्रतिपादन आफ्रोह महिला आघाडीच्या(Afroh women’s lead) राज्याध्यक्षा अनघा वैद्य यांनी केले. लवकरच महिला दिनाच्या (Women’s Day) निमिताने नागपूरला महिला मेळावा घेण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला .
ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची(State Executive) सभा दि 23 जाने. रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत महिला आघाडीच्या राज्य कार्यकारणीला मंजुरी प्रदान करण्यात आली. यावेळी अनघा वैद्य या बोलत होत्या. आफ्रोह महिला आघाडीची राज्य कार्यकारिणीही यावेळी घोषीत केली. अनघा वैद्य यांची पुन्हा राज्याध्यक्ष म्हणून तर सौ. प्रिया खापरे व श्रीमती माधुरी मेनकार (रत्नागिरी) यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आहे. सोलापूरच्या रुक्मिणी धनी यांची कार्याध्यक्षपदी तर सचिव म्हणून निता सोमवंशी – (अमरावती) यांची नियुक्ती(Appointment) करण्यात आली. सहसचिव पदी पुण्याच्या वनिता नंदनवार तर कोषाध्यक्ष म्हणून वंदना डेकाटे – नागपूर) यांची नियुक्ती केल्याचे घोषीत करण्यात आले. राज्य कार्यकारिणीत इतर सभासद म्हणून स्मिता भोईर – सदस्य (ठाणे), कलावती डोमकुंडवर, सदस्य (नागपूर), पुष्पा किटाळीकर सदस्य (पुणे), उषा पारसे सदस्य (रत्नागिरी), उषा मस्के सदस्य (सातारा), संध्या येन्नावार सदस्य(बीड), सुमन खोत सदस्य (सांगली), सुरेखा धकाते सदस्य (भंडारा), लिना भागवत सदस्य (पालघर), माधुरी पाटील सदस्य(रायगड), वासंती वेताळ सदस्य (रायगड), संगिता ठाकरे मानकर (पुणे) सदस्य आदींचा या कार्यकारीणी समावेश करण्यात आला आहे.
या सभेला खालील आफ्रोहचे नागपूर राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर, कोल्हापूर कार्याध्यक्ष राजेश सोनपरोते, नागपूर उपाध्यक्ष देवराम नंदनवार, यवतमाळ महासचिव रुपेश पाल, अमरावती मार्गदर्शक डॉ. दिपक केदारे, चंद्रपूर कायदेशीर सल्लागार मनोज जुनोनकर, नागपूर कायदे सल्लागार अनिलकुमार ढोले, अमरावती कोषाध्यक्ष मनीष पंचगाम, रत्नागिरी प्रसिद्ध प्रमुख गजेंद्र पौनिकर, नागपूर सदस्या श्रीमती अनघा वैद्य, ठाणे सदस्या श्रीमती प्रिया रामटेककर, नांदेड सदस्य दत्तात्रय अन्नमवाड, बुलढाणा सदस्य चंद्रभान सोनुने, उस्मानाबाद सदस्य महादेव बेदरे, मुंबई सदस्य नरेश खापरे आदी उपस्थित होते.