साखरीआगरच्या तरुणाला उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज
गुहागर : चिपळुण पुरग्रस्त परिसरात मदतकार्यासाठी गेलेला गुहागर तालुक्यातील साखरी आगर गणेशवाडी येथील युवक बिल्डींगच्या चौथ्या माळ्यावरुन पडुन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या तरुणाच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
A youth from Sakhari Agar Ganeshwadi in Guhagar taluka, who had gone to the flood-hit area of Chiplun for help, fell from the fourth floor of the building and sustained serious injuries. An appeal has been made for financial help for the treatment of this young man.
दि. 22 जुलै रोजी चिपळुण शहरात आलेल्या महापुरानंतर शहरातील जिव्हाळा बाजार, सागर सहजीवन सोसायटीतील वाशिष्टी दर्शन बिल्डिंगमधे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पुर्ववत करण्यासाठी आपल्या सहकाऱ्यांसमवेत गुहागर तालुक्यातील साखरी आगर गणेशवाडी येथील विश्वनाथ पांडुरंग भुते (वय 43) हा तरुण शनिवारी दि. 24 जुलै 2021 रोजी गेला असताना चौथ्या मजल्यावर पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करण्यासाठी जात असताना पत्र्याचा अंदाज न आल्याने खाली कोसळून गंभीररीत्या जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत वाशिष्टी दर्शन बिल्डिंग मधील रहिवाशांनी त्याला तातडीने चिपळुणमधील एसएमएस हॉस्पिटल येथे दाखल केले आहे. दोन दिवसाच्या उपचारानंतर विश्वनाथ भुते हा धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ. परमेश्वर गौंड यांनी सांगितले.
दरम्यान, विश्वनाथ हा धोक्याच्या बाहेर असला तरी त्याचे दोन्ही हात, पाय व चेहऱ्याला जबरदस्त मार असल्याने अनेक ठिकाणी शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे डॉक्टर गौंड यांनी सांगितले आहे. सदर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांची प्रकृती आणखी ठीक होण्याची नितांत गरज असल्याचेही डॉक्टरानी सांगितले. आपल्या संबंधितांच्या मदतीसाठी गेलेल्या विश्वनाथ भुते याच्या अपघात हा कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. विश्वनाथचे कुटुंब अतिशय गरीब असुन पत्नी आणि दोन मुले असा त्याचा परिवार आहे. पुरग्रस्तांच्या मदतीसाठी आलेला विश्वनाथ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पूर्ववत व्हावी याकरता प्रत्यक्ष मदत करत असतानाच बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरून पडून गंभीर झालेला असल्याने पूरग्रस्तांना मिळणार्या मदती प्रमाणेच विश्वनाथच्या उपचाराकरता व त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करता शासनाकडून आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी वाशिष्टी दर्शन बिल्डींग मधील रहिवाशांनी अशा प्रकारचा विनंती अर्ज तहसीलदार चिपळूण यांना केला आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेला असताना विश्वनाथवर ओढवलेला गंभीर प्रसंग लक्षात घेता समाजातील अनेक दानशुर व्यक्ती परोपकारी वृत्तीच्या विश्वनाथ भुते याला सढळ हस्ते मदत करतील अशी अपेक्षा परिस्थितीने अतिशय गरीब असणाऱ्या साखरी आगर गणेश वाडी येथील भुते कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
चिपळुण येथे पुरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेल्या गुहागरमधील अपघातग्रस्त तरुणाला उपचारासाठी वैद्यकीय निधी उपलब्द करुन द्यावा – डॉ.विनय नातू
श्री. विश्वनाथ पांडुरंग भुते, वय 43, राहणार गणेश वाडी, साखरी आगर, तालुका गुहागर हा दि.24/7/2021 रोजी चिपळूण येथील पूरस्थिती नंतर त्या भागातील वाशिष्ठी दर्शन बिल्डिंग, सागर सहजीवन सोसायटी, जिव्हाळा बाजार समोर येथे आपदग्रस्तांना च्या मदतीचे काम करण्याकरता गेले होते. तेथे काम करत असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना चिपळूण येथील एस एम एस या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे त्यांच्या वैद्यकीय औषधोपचार शस्त्रक्रिया याकरता मोठ्या प्रमाणावरती खर्च येणार आहे. श्रीयुत विभुते हे मदतीच्या भावनेतूनच चिपळूण येथे आले होते व मदत करत असताना अपघात झालेला असल्याने शासनाने आपदग्रस्त अपघात वैद्यकीय निधी उपलब्ध करून श्रीयुत भुते यांच्या सर्व वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती शासनामार्फत करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुनर्वसन मंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा पोलीस निरीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे