ढोल-ताशांच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत
गुहागर, ता. 28 : तालुक्यातील उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक असलेल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदुर नवानगर. या मराठी शाळेमध्ये शाळा पूर्वतयारी मेळावा घेण्यात आला. यामध्ये विविध स्टॉलची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी केली होती. स्टॉलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या मेळाव्यासाठी पालक, ग्रामस्थ यांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. अंगणवाडी सेविका मत्स्यगंधा कोळथरकर व सानिया नाटेकर यांनी प्रार्थना सादर केली. School Preparatory Meet in Nawanagar

गावातून ढोल-ताशांच्या गजरामध्ये वाजत गाजत, नवागत विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण होईल असा वैशिष्ट्यपूर्ण पोशाख सजवून, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी यांच्या साथीने जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये रॅली आयोजित करण्यात आली. त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते देवरामजी भोसले साहेब, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सानिया वनकर, उपाध्यक्षा सुषमा रोहीलकर, सदस्य सुरक्षा रोहीलकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पालशेतकर, शिक्षक वृंद सत्वशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दामवार, निलोफर शेख, अंगणवाडी शिक्षिका मत्स्यगंधा कोळथरकर, सानिया नाटेकर, महिला मंडळाच्या पदाधिकारी, प्रतिष्ठित ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ पदाधिकारी व सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. School Preparatory Meet in Nawanagar
स्वागत कार्यक्रमांमध्ये शाळा व्यवस्थापन समितीतर्फे औक्षण करून विद्यार्थ्यांना फेटे व मुखवटे सजवून शैक्षणिक साहित्य पुष्पगुच्छ व खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. तर चिमुकल्या नवागत बालक कलाकारानी समूह नृत्य सादर केले. शाळा पूर्वतयारी मेळाव्या निमित्त आयोजित विविध स्टॉलचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते देवराम भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांची नोंदणी, वजन-उंची यासह विविध खेळ व कौशल्य पूर्ण हालचाली घेऊन विद्यार्थ्यांच्या क्षमतांचा अंदाज घेण्यात आला. पालकांचे समुपदेशन करण्यात आले. विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. School Preparatory Meet in Nawanagar

त्यावेळी मार्गदर्शन करताना मुख्याध्यापक मनोज पाटील म्हणाले की शाळा पूर्वतयारी मेळावा हा आमच्या शाळेतील मोठा उत्सवच आहे. प्राथमिक शिक्षण हाच खरा उच्च शिक्षणाचा पाया आहे. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी विविध वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाईल व गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल. वेलदुर नवानगर शाळेचा पट नेहमीच वाढत असून त्याचे श्रेय शाळेवर प्रेम करणाऱ्या ग्रामस्थ व पालक यांना मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी दिले. पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच आम्ही विविध उपक्रम राबवू शकतो याचा आम्हाला अभिमान वाटतो. पालक सहकार्याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. School Preparatory Meet in Nawanagar
यापूर्वीही शाळेची पालक सहभाग या विषयी राज्यस्तरीय शिक्षण वारीमध्ये मुंबई, कोल्हापूर, वर्धा, नांदेड, जळगाव याठिकाणी शाळेच्या स्टॉलची निवड करण्यात आली होती. पालक व ग्रामस्थ यांनी या मेळाव्या बद्दल समाधान व्यक्त केले. सदर कार्यक्रम केंद्रीय प्रमुख अशोक गावणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली झाला असून कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मनोज पाटील शिक्षकवृंद सत्यशीला जगदाळे, पल्लवी घुले, अंजली मुद्दलवार, निलोफर शेख यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्वशीला जगदाळे यांनी केले. School Preparatory Meet in Nawanagar
