म्हसकर कुटुंबाने जपली सत्यशोधक परंपरा
गुहागर, ता. 29 : सत्यशोधक चळवळीतील (Satyshodhak Movement) कार्यकर्ते, कुणबी युवाचे शिलेदार नरेश म्हसकर यांचे वडील कै. तानाजी भागोजी म्हसकर यांचे अनसुट रविवार दिनांक २६/९/२०२१ रोजी, साखरी त्रिशूळ म्हसकर वाडी, (तालुका – गुहागर , जिल्हा – रत्नागिरी) येथे सत्य शोधक चळवळीप्रमाणे फोटो पूजनाने (culture) करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारने जात निहाय जन गणना करावी. ओबीसी समाजाचे आरक्षण कायम रहावे. तसेच ओबीसी समाजाच्या मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात. संतोष म्हसकर, नरेश म्हसकर आणि म्हसकर कुटुंब यांनी घेतलेला हा निर्णय लाख मोलाचा आहे त्यावर बहुजन समाजाने विचार करणे गरजेचे आहे. असे विचार मान्यवरांनी मांडले.
अनसुट विधी सत्यशोधक पद्धतीने करण्यामागचा मूळ उद्देश हा कुणबी (ओबीसी) समाजातून सत्यशोधक प्रवर्तक निर्माण करणे. समाजाची व्यवस्था निर्माण करण्याचा आहे. अशी माहिती नरेश म्हसकर यांनी दिली.
अनसुट विधीचे वेळी मिळालेला दुखवटा म्हसकर कुटुंबियांनी दान केला. २५०१/- रुपये शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेकडे दिले. तर २५०१/- हे गावाच्या सभागृहाच्या देखभालीसाठी दिले.
कोकणचे गाडगे बाबा मा. मारुती काका जोशी ( जोयशी) यांचे सहकारी विलास जी. डी. के. सर यांच्या मार्गदर्शनाखाली फोटो पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला सत्यशोधक चळवळीतील अरुण भुवड ( वरवेली), अंजन वेलदुरकर ( वेलदुर), राजेश जावळे (वेलदूर), डी. के. बने (अंजनवेल) सुधीर विठ्ठल मोरे (कोकरे चिपळूण) इत्यादी कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते