स्कीमच्या पहिल्याच दिवशी मिळाला 80 हजाराचा हॅण्डसेट मोफत
Govinda Mobile Shoopy
गुहागर, ता. 2 ; दसरा दिवाळी सण म्हणजे खरेदीचा हंगाम. हे लक्षात घेवून विविध मोबाईल कंपन्यांनी ग्राहकांसाठी आकर्षक स्कीम जाहीर केल्या आहेत. या सर्व स्कीम 1 ऑक्टोबरपासून लागू झाल्या. स्कीमच्या पहिल्याच दिवशी प्रणित सावंतने Govinda Mobile Shoopy मध्ये Oppo कंपनीचा Mobile खरेदी केला. त्या मोबाईलबरोबर असलेले कुपन प्रणित सावंतने स्क्रॅच केले. त्यामध्ये 80 हजार रुपये किंमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल हॅण्डसेटचा भाग्यवान मानकरी प्रणित सावंत ठरला. पहिल्याच दिवशी Govinda Mobile Shoopy मधुन खरेदी करताना भाग्यवान विजेता ठरल्याचा मला आनंद आहे. मला लागलेले बक्षिस सन्मानपुर्वक गोविंदा मोबाईल शॉपीचे मालक शेट्ये यांनी दिल्याची प्रतिक्रिया प्रणित सावंत यांनी व्यक्त केली. Pranit became a lucky customer of Govinda Mobile

Govinda Mobile Shoopy चा भाग्यवान ग्राहक
दसरा दिवाळीनिमित्त Oppo कंपनीद्वारे ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी स्क्रॅच कुपन योजना सुरु केली आहे. ही योजना 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीसाठी आहे. स्कीम सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी प्रणित सावंत हे ग्राहक मोबाईल खरेदीसाठी गोविंदा मोबाईल शॉपीमध्ये आले होते. दुकानातील कर्मचाऱ्यांनी प्रणितला सेवा देताना विविध कंपन्यांच्या स्कीमही सांगितल्या. यावेळी प्रणितने ओप्पो कंपनीचा मोबाईल खरेदी केला. लगेचच ओप्पोच्या स्कीममधील स्क्रॅच कुपन प्रणितला देण्यात आले. हे कुपन स्क्रॅच केल्यावर प्रणितने विकत घेतलेल्या मोबाईलपेक्षा अधिक किंमतीचा व अधिक फिचर्स असणारा 80 हजार रुपयांचा मोबाईल स्कीममधुन त्याला मिळाला. या स्कीमचे पहिले भाग्यवान विजेते आपण ठरलो आहोत याचा स्वाभाविक आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. बक्षिस म्हणून मिळालेला मोबाईल ओप्पो कंपनीने तत्काळ प्रणित सावंतला दिला. स्कीमच्या पहिल्याच दिवशी आपल्याकडील ग्राहक मोठ्या बक्षिसाचा मानकरी ठरला याचा आनंद गोविंदा मोबाईल शॉपीमध्येही सर्वांना झाला. प्रणित सावंतला हा मोबाईल गोविंदा शॉपीचे मालक राहुल शेट्ये, ओप्पो कंपनीचे टीम लिडर कुंदन कापडी, ओप्पो कंपनीचे वितरक गिरीश चितळे आणि गोविंद शॉपीमधील सेल्स मॅनेजर जयेश साळवी यांच्या उपस्थितीत सन्मानपूर्वक देण्यात आला. Pranit became a lucky customer of Govinda Mobile

Govinda Mobile Shoopy
शृंगारतळीतील गोविंदा मोबाईल शॉपी हे गुहागर तालुक्यातील ओप्पो कंपनीचे सर्वाधिक मोबाईल विक्री करणारी आस्थापना आहे. या मोबाईल शॉपीमध्ये Samsung, Xiaomi / Redmi / POCO, Realme, Vivo, Oppo, OnePlus, Apple, Motorola, Nokia, Lava, Micromax (भारतीय ब्रँड्स), Nothing, Infinix, Tecno, आदी कंपन्यांचे मोबाईल विक्रीसाठी असतात. या दुकानात सर्व मोबाईल कंपन्यांच्या स्कीम (योजना) यशस्वीपणे राबविल्या जातात. येथे ग्राहकांना विक्री पश्चात गुणवत्तायुक्त सेवाही मिळते. त्यामुळे ग्राहक समाधानी असतात. Pranit became a lucky customer of Govinda Mobile

Schems of Govinda Mobile Shoopy
यावेळी मोबाईल कंपन्यांच्या स्कीमबरोबरच गोविंदा मोबाईल शॉपीने ग्राहकांसाठी स्वतंत्र स्कीम सुरु केली आहे. गोविंदा मोबाईल शॉपीमध्ये ग्राहकाने 40 हजार रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा मोबाईल खरेदी केल्यास त्या ग्राहकाला पुढील वर्षभरात जर मोबाईलचा डिस्प्ले (स्क्रीन) नादुरुस्त झाला तर डिस्प्ले मोफत दुरुस्त करुन दिला जाणार आहे. याशिवाय विशिष्ट मोबाईल हॅण्डसेटसाठी गोविंदा मोबाईल शॉपीमध्ये 1 ते 2 वर्षांची वाढीव वॉरन्टी देखील दिली जाणार आहे. ग्राहकांनी सर्व मोबाईल कंपन्यांच्या योजनांसह गोविंदा मोबाईल शॉपीच्या योजना माहिती करुन घेण्यासाठी शॉपीला भेट द्यावी, असे आवाहन राहुल शेट्ये यांनी केले आहे. Pranit became a lucky customer of Govinda Mobile