• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

by Mayuresh Patnakar
March 22, 2021
in Old News
19 0
0
38
SHARES
108
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आरोपीला अटक, पोक्सो अंतर्गत कारवाई

गुहागर, ता. 21 : लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेवून एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. या घटनेतील आरोपी राजेश शंकर रामाणेला रविवारी सायंकाळी 7.30 वा. गुहागर पोलीसांनी अटक केली आहे. बालकांचा लैंगिक अत्याचार कायद्याखाली त्यांच्यावर कारवाई सुरु आहे.
गुहागर तालुक्यातील एका गावात शुक्रवार 19 मार्च रोजी दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान हा गुन्हा घडला. घटनेतील आठ वर्षांची पिडीता आपल्या भावांबरोबर अंगणात खेळत होती. त्यावेळी सदर नराधमाने अंगणात जावून या मुलीच्या हातात पाकीट दिले व ते पाकीट घरात ठेवायला सांगितले. ती मुलगी हे पाकीट घेवून घरात गेली त्यावेळी त्या घरात अन्य कोणीच नव्हते. याचाच फायदा घेवून सदर नराधमाने तीच्याजवळ अश्लील चाळे केले.
मात्र सदर नराधमाच्या घरात तीला जाताना एकाने पाहिले होते.
शुक्रवारी वाडीतील लग्न उरकुन सर्व मंडळी घरी परतली. तेव्हा सदर मुलीच्या पालकांनी मुलीला विश्र्वासात घेवून दुपारी काय झाले ते समजून घेतले. वाडीतच लग्न आणि हळद उतरणीचा कार्यक्रम असल्याने याबाबतची तक्रार पालकांनी रविवारी 21 तारखेला गुहागर पोलीसांकडे नोंदवली.
अल्पवयीन मुलीशी अतिप्रसंग झालेला असल्याने तातडीने पोलीसांनी कारवाई करत राजेश शंकर रामाणेला अटक केली आहे.

Tags: Breaking NewsBreaking News GuhagarCrimeCrime NewsGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsPocsoPoliceगुहागरगुहागर न्युजमराठी बातम्यालेटेस्ट अपटेड्सलेटेस्ट मराठी न्यूज
Share15SendTweet10
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.