दिव्यांग, निराधार अशा चौघांना साहित्याचे वाटप
गुहागर : जुलैच्या शेवटच्या आठवड्यात चिपळूण येथील महापुराने अनेकांचे संसार उघड्यावर पडले…! मोठयाप्रमाणात जिवीतहानी झाली नसली तरी संसारासाठी उभ्या केलेला स्वप्नांचा गाडा या पूरात वाहून गेला. सर्वसामान्य व हातावर पोट असलेल्यांच्या व्यथा तर निराळ्याच! त्यांचं तर सर्वस्वच वाहून गेलं. या महापुरातून सर्वस्व वाहून गेलेलं असताना मात्र नेहमीप्रमाणे कोकणातील..रत्नागिरी जिल्ह्यातील ..चिपळूण शहरातील माणूसकी मात्र जिवंत राहीली.अनेक सामाजिक संस्थांनी आपल्या परीने पुरग्रस्ताना मदतकार्य केलं व अजूनही सुरू आहे.
The organization Afroh (Organization for Human Rights), which fights for tribal workers, also distributed aid to four flood victims in Chiplun in the form of literature and cash.
अन्यायग्रस्त आदिवासी कर्मचा-यांसाठी लढणा-या आफ्रोह (ऑर्गनायझेशन फाॅर राईट्स ऑफ ह्युमन) या संघनेनेही चिपळूण येथील चार पूरग्रस्तांना मदतीचा.. खारीचा वाटा..म्हणूण साहित्य व रोख स्वरूपात मदतीचे वाटप करण्यात आले.
आफ्रोह संघटनेच्या जिल्ह्यातील व जिल्ह्या बाहेरील कर्मचा-यांमध्ये आपणही पुरग्रस्ताच्या मदतीसाठी थोडा वाटा उचलावा, असं मत कर्मचा-यांसमोर मांडलं. सर्वांनीच त्याला होकार दिला. फुल ना फुलाची पाकळी.. आपण मदत करू या असं ठरलं. 4 व्यक्ती पैकी 2 व्यक्ती या दिव्यांग आहे, एक विधवा व एक इतर. शरीफ मुजावर व श्री. बारकू फुटक ह्या त्या दोन दिव्यांग व्यक्ती. मुजावर यांचं एकाचं झेराॅक्स, काॅम्पयूटरचं छोटंसं दुकान व फुटक यांची वडापावची गाडी.. पुरात वाहून गेलं होतं. भेलसाई रोहीदासवाडी येथील निराधार विधवा श्रीमती ललिता कदम यांचं एसटी स्टॅन्डसमोर भूर्जीपाव, चहाची इतर पदार्थाची हातगाडी, सगळे साहित्य वाहून गेलं. व यशवंत शिंदे यांचं केस कापायचं सलूनचं सगळं साहित्य खराब झालं होतं. चारही पुरग्रस्तांना त्यांचे व्यवसाय सुरू होण्यासाठी उपयोगी येतील अशा वसतुंचे कीट प्रिंटर, कागदाची रीम, शेगडी, कुकर,थोडी भांडी, किराणा जिन्नस व श्री.शिंदे यांना सलूनच्या साहित्यासाठी 5000 रोख रक्कम असं मदतीचं स्वरूप आफ्रोहतर्फे खारीचा वाटा म्हणून चारही पुरग्रस्तांना देण्यात आलं.पंचायत समिती चिपळूणचे विस्तार अधिकारी बी.बी.पाटील यांनी दोन झेराॅक्स कागदाच्या रीमचे बंडलही शरीफ मुजावर यांच्या साठी दिले. संत गाडगेबाबा मिशन मुंबईचे चेअरमेन मधुसुदन मोहीतेपाटील यांच्या सुचनेनुसार मिशनचे कार्यकर्ते व आफ्रोहचे सदस्य शिक्षक संजय सोनवणे यांनीही जिवनावश्यक वस्तुंचे कीट चारही पुरग्रस्तांना यावेळी दिले. परिवर्तन संस्था खेर्डी चिपळूण येथे हे सर्व साहित्य पूरग्रस्तांना आफ्रोहच्या वतीने वाटप करण्यात आले.
यावेळी आफ्रोहचे राज्य कार्यकारिणी सदस्य व जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर, महिला आघाडीच्या सचिव माधुरी मेनकार, संजय सोनवणे, कैलास बावीसकर, परिवर्तन संस्थेचे गणेश खेतले, दुर्गाशक्ती सामाजिक संस्थेच्या आश्वीनी भुस्कुटे, अपंग संस्थेचे मंडणगड येथील शेतकरी रूपेश पवार, श्री.लोखंडे व पुरग्रस्त शरीफ मुजावर,बारकू फुटक, ललीता कदम, यशवंत शिंदे यांच्या वतीने संदीप शिंदे यावेळी उपस्थित होते.