गुहागर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबईतर्फे गुहागर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व दुर्गाबाई हरी वैद्य माध्यमिक व भागि्र्थीबाई सुदाम पाटील जुनियर कॉलेज अंजनवेल तालुका गुहागरचे मुख्याध्यापक श्री. मंगेश दौलत गोरीवले यांनी राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार नुकताच संपादन केला.
On behalf of Maharashtra State Secondary and Higher Secondary School Headmasters Association, Mumbai President of Guhagar Taluka Headmasters Association and Headmaster of Durgabai Hari Vaidya Madhyamik and Bhagirthibai Sudam Patil Junior College Anjanvel Taluka Guhagar Mr. Mangesh Daulat Gorivale recently bagged the state level Ideal Headmaster Award.


राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान समारंभ पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामधील श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी माजी खासदार शिवाजीराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार संपादन केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा गुहागरतर्फे श्री.मंगेश गोरीवले यांचा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी शाखा शृंगारतळी येथे नुकताच गुहागरचे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष सुमंत भिडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे संचालक महेंद्र साळगावकर, माजी तज्ञ संचालक शिवाजी आडेकर , मुख्याध्यापक जी.एस. जबडे , एस.डी.हिरवे , महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद गुहागरचे सचिव शावरी बंदिछोडे, मुंढर हायस्कूलचे शिक्षक संदीप शिर्के, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे गुहागर तालुका माजी अध्यक्ष गणेश कुलकर्णी , माजी सचिव विनायक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.