• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 June 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बोर्‍या फाटा येथे पकडली गोवा बनावटीची दारू

by Mayuresh Patnakar
January 14, 2021
in Old News
16 1
0
बोर्‍या फाटा येथे पकडली गोवा बनावटीची दारू
32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुहागर पोलिसांची कारवाई

गुहागर, ता. 14 : येथील पोलिसांना बोर्‍या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य गोवा बनावटीचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई पोलिसांनी केली. रिक्षा चालक नितेश दिनेश आरेकर यांच्यावर विना परवाना मद्याची वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस कॉन्स्टेबल संतोष साळसकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, बोर्‍या फाटा परिसरात मद्याची वहातूक होत असल्याची टीप आर. ए. कांबळे यांना मिळाली पेट्रोलिंग करताना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, हेडकॉन्स्टेबल आर. एल. कांबळे, दोन पंचांसह बोर्‍या फाटा येथे पाळतीवर थांबले होते. सायंकाळी 4 च्या सुमारास सुरळ मार्गे एक रिक्षा (क्र. एम एच 08 आर 9943) वेगाने येताना पोलिसांनी पाहिली. सदर रिक्षा थांबवून पोलीस तपासणी करत होते. त्यावेळी रिक्षामध्ये प्रवासी बसतात त्या आसनामागील डिकी मद्याचे खोके सापडले. त्यामध्ये मद्याचा 16560 रुपये किंमतीच्या 60 बाटल्या सापडल्या. ही रिक्षा नितेश दिनेश आरेकर (वय 30, रा. नरवण भंडारवाडा) चालवीत होता. त्याच्याकडे मद्य वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता कोणताही परवाना नसल्याचे नितेशने सांगितले.
पोलिसांनी विना परवाना वहातुकीसाठी वापरण्यात आलेली 40 हजार रुपये मूल्याची रिक्षा आणि 16560 रुपये किंमतीचे मद्य असा एकूण 56560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नितेश आरेकर याच्यावर बेकायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू विक्री व धंदा करण्याकरिता वाहतूक केल्याबद्दल दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: Crime NewsGuhagarGuhagar NewsIllegal LiquorLatest NewsMarathi NewsPoliceअवैध मद्यसाठागुन्हागुहागरगुहागर न्युजमराठी बातम्यामहाराष्ट्र पोलीस
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.