• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
9 May 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

निकृष्ट पोषण आहार गैरकारभाराची चौकशी व्हावी – डॉ. नातू

by Ganesh Dhanawade
December 10, 2021
in Politics
18 0
0
Dr Vinay Natu
35
SHARES
99
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

23.08.2020

गुहागर : खडपोली औद्योगिक वसाहतीत निकृष्ट दर्जाचा अंगणवाडीचा पोषण आहार अत्यंत खराब व नियमबाह्यपणे आढळून आला होता. अद्यापही या प्रकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. या गैरकारभाराची सखोल चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. असे निवेदन भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्र्यांकडे केले आहे. 

खडपोली औद्योगिक वसाहतीत निकृष्ट दर्जाचा अंगणवाडीचा पोषण आहार आढळून होता. सदर इमारतीची साधी स्वच्छता केलेली नव्हती. तसेच येथे पोषण आहाराचे काम करण्यासाठी अन्न भेसळ खात्याची परवानगी नव्हती. तेथील शिल्लक माल नष्ट केला गेला.  महाराष्ट्र स्टेट को. ऑप. कन्झुमर्स फेडरेशनमार्फत पुरवठा होणारा अंगणवाड्यांचा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा होता. शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी फेडरेशन सोबत दि. 17 जुलै 2020 रोजी करारनामा केला. आजपर्यंत कधीही उन्हाळी सुट्टीच्या काळात मुलांना पोषण आहार दिला गेला नव्हता. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु झालेल्या नाहीत असे असताना शिक्षण संचालकांनी दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी व्हीडीओ काँन्फरन्सद्वारे बैठक घेतली. त्यावेळी शाळास्तरावर शिल्लक असणारे धान्य व धान्यादी माल आदी वस्तू विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करावे असे सांगितले. प्रत्यक्षात मार्च 2020 कोरोना काळानंतर शिल्लक असणारा धान्यसाठा एप्रिल, मे मध्ये वितरीत करण्यात आलेला होता.

जून 2020 पासून शाळा सुरु न झाल्याने धान्यसाठा दि. 3 ऑगस्ट 2020 रोजी शाळांमध्ये नव्हताच. असे असताना दि. 17 ऑगस्ट 2020 रोजी शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी पोषण आहार वाटपाबाबत पत्र काढले. निकृष्ट प्रकाराची मूगडाळ व हरभरा, दगडमातीयुक्त कडधान्य, वासे येणारे मसाले प्रत्येक शाळेमध्ये पाठवले आहे. शाळा बंद तसेच अनेक ठिकाणी संचारबंदी असताना याप्रकारे शिक्षण खात्यामधील निधीचा अपव्यय करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराच्या नावावर अन्य दलालांचे भले करण्याचा हा प्रयत्न आहे. जे गोडावून प्लाँट नं. 44 खडपोली एमआयडीसी येथे सील केले तेथेच संबंधितांवर गुन्हे दाखल केले. त्याच ठिकाणी खराब मालाचे पँकिंग 16 आँगस्ट रोजी करुन हा माल शाळांच्या माथी मारला जात आहे. या सर्व गैरकारभाराची चौकशी करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत तसेच निकृष्ट धान्याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांसह संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती डाँ. नातू यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 

Tags: BJPDr NatuGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNews in Guhagarमराठी बातम्या
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.