सत्ताधारी गटाच्या तीन नगरसेविकांची अनुपस्थिती
गुहागर, ता. 23 : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ सौ. प्रणिता प्रविण साटले यांच्या गळ्यात पडली. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेश भोसले यांचा 9 विरुध्द 6 मतांनी पराभव केला. मात्र या निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेविका आणि शिवसेनेची (Shiv Sena) एक नगरसेविका अनुपस्थित होती. त्यामुळे शहर विकास आघाडीत आलबेल नाही. हे समोर आले आहे. In the election of Guhgar Nagar Panchayat, Mrs. Pranita Praveen Satle win the Deputy Mayor Election easily. She defeated BJP candidate Umesh Bhosale by 9 to 6 votes. However, three corporators of the ruling party were absent at the time of election.


गुहागर नगरपंचायतीची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक (Deputy Mayor Election) आज पार पडली. शहर विकास आघाडीतर्फे सौ. प्रणिता प्रविण साटले यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपने (BJP) उपनगराध्यक्ष पदासाठी उमेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरला होता.


नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीचे 9, शिवसेना (Shiv Sena) 1, राष्ट्रवादी (NCP) 1 आणि भाजप (BJP) 6 असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षांना नगरसेवक म्हणून एक मत देता येते. आणि समान मते पडल्यास नगराध्यक्ष म्हणून आणखी एक मत देता येते. शहर विकास आघाडीकडे नगराध्यक्षांच्या दोन मतांसह 13 मते होती. त्यामुळे प्रणिता साटले निवडून येणार हे निश्चित होते. शिवसेनेच्या नगरसेविका निलीमा गुरव विवाह होवून बाहेरगावी गेल्याने त्या येणार नव्हत्या. हे सर्वांनीच गृहित धरले होते. शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ. मनाली सांगळे व सौ. स्नेहा नितीन सांगळे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे प्रणिता साटले यांना नगराध्यक्षांच्या एका मतासह 9 मते मिळाली तर उमेश भोसले यांना 6 मते मिळाली.

