७ ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित
खेड, ता. 13 : मुंबई-गोवा महामार्गावरील कोकण चे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा कशेडी घाट हा मृत्यूचा सापळा बनला आहे. जीवघेणी वळणे आणि अरुंद व धोकादायक रस्ते तसेच तीव्र उतार आणि खोल दरी रस्त्याच्या विशिष्ठ पद्धतीमुळे भीषण अपघातांचे प्रमाण या घाटात वाढले आहे. गेल्या १५ दिवसात ८ मोठे अपघात झाले आहेत, वाढत्या अपघातांची संख्या चिंताजनक असल्याने महामार्ग पोलीस आणि महामार्ग बांधकाम विभागाने १३ किलोमीटर असणाऱ्या या कशेडी घाटातील ७ ठिकाणांना ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित केले आहे. महामार्ग पोलीस आणि महामार्ग बांधकाम विभागाने कशेडी घाटाची पाहाणी करुन हा निर्णय घेतला आहे. Black spot’ at 7 places in Kashedi Ghat
कशेडी आंबा या ठिकाणचे नागमोडी वळण, हे अपघात वळण क्षेत्र आहे. याच वळणावर अनेक अपघात आजपर्यंत झाले आहेत. आणि असंख्य लोकांना याच नागमोडी वळणावर जीव गमवावा लागला आहे. तीव्र उतार आणि अवघड वळण या कारणामुळे हे ठिकाण अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. Black spot’ at 7 places in Kashedi Ghat
हे ठिकाण गोव्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना कशेडी आंबा या ठिकाणी असणारे पहिलेच ठिकाण आहे. या ठिकाणी आत्तापर्यंत असंख्य अवजड वाहनांना अपघात झाला आहे. अनेक लहान गाड्यांचा देखील भीषण अपघात झाला आहे. अनेक लोकांना आपला जीव याच ठिकाणी गमवावा लागला आहे. कशेडी घाटातील दुसरे अवघड वळण म्हणून कशेडी चेक पोस्ट उतरल्यानंतर लागणारे पहिले अवघड वळण आहे, कशेडी घाटातील सर्वात मोठा यूटर्न असलेले दुसरे अपघात प्रवण क्षेत्र तसेच ब्लॅक स्पॉट म्हणून हे घोषित करण्यात आले आहे. याच ठिकाणाहून अनेक वाहने दरीत कोसळून जीवित हानी झाली आहे. Black spot’ at 7 places in Kashedi Ghat
कशेडी घाट चढल्यानंतर पोलादपूरच्या दिशेला असणारे ठिकाण पोलादपूरनजिक असून सतत खचणारा रस्ता आणि होणाऱ्या भूस्खलनामुळे या ठिकाणी अत्यंत खराब रस्ता असणारे हे ठिकाण आहे. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असणाऱ्या या ठिकाणी आतापर्यंत अनेक अपघात झाले असून या ठिकाणाला देखील प्रमुख अपघात प्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) म्हणून घोषित करण्यात आले आहे. Black spot’ at 7 places in Kashedi Ghat


काही दिवसांपूर्वी आमदार योगेश कदम यांच्या गाडीला झालेला अपघात हा याच ठिकाणापासासून काही अंतरावर झाला होता. याच ठिकाणाजवळ तीन महिन्यांपूर्वी एक डम्पर रिक्षावर कोसळून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू देखील याच ठिकाणी झाला होता, पोलादपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील कशेडी घाटात ३ ब्लॅक स्पॉट आहेत गेल्या आठवडाभरात आठ अपघात त्या ठिकाणी झाले आहेत. मात्र अद्यापि या घाटात ठोस उपाययोजना करण्यात न आल्याने घाट मृत्यूचा सापळा ठरत आहे. Black spot’ at 7 places in Kashedi Ghat