उमेश भोसले, उपनगराध्यक्ष भाजप कार्यकर्ती
गुहागर, ता. 23 : विषय समित्यांच्या निवडीचे वेळी गुहागर नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्ष म्हणून काम करणार. असे आम्ही जाहीर केले होते. ते वचन आजही आम्ही पाळले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सौ. प्रणिता साटले या भाजपच्याच कार्यकर्त्या आहेत. त्या शहर विकास आघाडीमधुन नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी देखील नैतिकता दाखवत शहर विकास आघाडीसोबत एकनिष्ठा दाखविली आहे. यालाच भाजपची तत्वनिष्ठा म्हणतात. असे प्रतिपादन भाजपचे गटनेते उमेश भोसले यांनी केले. (BJP is party of principledness)


BJP announced at the time of selection of subject committees that, Our corporators will act as the Opposition Party in the Guhagar Nagar Panchayat now. We still keep that promise today. Newly elected Deputy Mayor Mrs. Pranita Satle is a BJP worker. She was elected as a corporator from Shahar Vikas Aaghadi. She has also shown loyalty to the Shahar Vikas Aaghadi by showing morality. This is called BJP’s principledness. This statement was made by BJP group leader Umesh Bhosale.


संख्याबळ नसताना भाजपने उमेदवारी (BJP Candidate) का दाखल केली. याबाबत बोलताना उमेश भोसले म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष (National Party) म्हणून तांत्रिकदृष्ट्या काही गोष्टी करणे महत्त्वाचे असते. सत्ताधारी गटाकडे एकूण 13 मते तर आमच्याकडे केवळ 6 मते होती. त्यामुळे विजय त्यांचा होणार हे माहिती होते. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीपूर्वी शहर विकास आघाडीने तडजोड केली असती तर हे पद सहजी आम्हांला मिळाले असते. मात्र आघाडीने सौ. प्रणिता साटले यांचे नाव निश्चित केले. त्या भाजपच्या कार्यकर्त्या (BJP Worker) आहेत. राजकीय वाटाघाटीत त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली नसती. सौ. प्रणिता यांनी नैतिकता (Morality) दाखवत शहर विकास आघाडीबरोबर एकनिष्ठ रहाणे (loyalty) स्विकारले होते. अशावेळी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यावर आपण अन्याय करणे अयोग्य आहे. तसेच 4 ऑक्टोबरला विषय समित्यांच्या निवडीचे वेळी आम्ही सत्तेत रहाणार नाही. सक्षम विरोधी पक्षाची (Competent opposition) भुमिका पार पाडू. असे वचन पत्रकार परिषद घेवून दिले होते. म्हणूनच भाजपने (BJP) आघाडीसोबत तडजोड केली नाही.

