• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरच्या उपनगराध्यक्षपदी प्रणिता साटले

by Ganesh Dhanawade
December 14, 2021
in Guhagar
16 0
1
Deputy Mayor Election

सौ. प्रणिता साटले यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करताना शहर विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक

32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

सत्ताधारी गटाच्या तीन नगरसेविकांची अनुपस्थिती

गुहागर, ता. 23 : नगरपंचायतीच्या निवडणुकीत उपनगराध्यक्ष पदाची माळ सौ. प्रणिता प्रविण साटले यांच्या गळ्यात पडली. त्यांनी भाजपचे उमेदवार उमेश भोसले यांचा 9 विरुध्द 6 मतांनी पराभव केला. मात्र या निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी शहर विकास आघाडीच्या दोन नगरसेविका आणि शिवसेनेची (Shiv Sena) एक नगरसेविका अनुपस्थित होती. त्यामुळे शहर विकास आघाडीत आलबेल नाही.  हे समोर आले आहे.  In the election of Guhgar Nagar Panchayat, Mrs. Pranita Praveen Satle win the Deputy Mayor Election easily. She defeated BJP candidate Umesh Bhosale by 9 to 6 votes. However, three corporators of the ruling party were absent at the time of election.

गुहागर नगरपंचायतीची उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक (Deputy Mayor Election) आज पार पडली. शहर विकास आघाडीतर्फे सौ. प्रणिता प्रविण साटले यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपने (BJP) उपनगराध्यक्ष पदासाठी उमेश भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरला होता.

नगरपंचायतीमध्ये शहर विकास आघाडीचे 9, शिवसेना (Shiv Sena) 1, राष्ट्रवादी (NCP) 1 आणि भाजप (BJP) 6 असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षांना नगरसेवक म्हणून एक मत देता येते. आणि समान मते पडल्यास नगराध्यक्ष म्हणून आणखी एक मत देता येते. शहर विकास आघाडीकडे नगराध्यक्षांच्या दोन मतांसह 13 मते होती. त्यामुळे प्रणिता साटले निवडून येणार हे निश्चित होते. शिवसेनेच्या नगरसेविका निलीमा गुरव विवाह होवून बाहेरगावी गेल्याने त्या येणार नव्हत्या. हे सर्वांनीच गृहित धरले होते. शहर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ. मनाली सांगळे व सौ. स्नेहा नितीन सांगळे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. त्यामुळे प्रणिता साटले यांना नगराध्यक्षांच्या एका मतासह 9 मते मिळाली तर उमेश भोसले यांना 6 मते मिळाली.

या निवडणुकीमुळे शहर विकास आघाडीत सारे काही आलबेल (All is not well) नाही. हे समोर आले आहे.  सौ. मनाली सांगळे यांना महिला व बालकल्याण समितीच्या सभापती करण्यात येणार होते. परंतू आघाडीला सूचक, अनुमोदकासाठी एक सदस्य कमी पडला. समितीची निवडणूकच रद्द (Election postponed) करावी लागली.  त्यामुळे मनाली सांगळे नाराज आहेत. सौ. स्नेहा सांगळेही नगरपंचायतीच्या कारभारावर नाराज आहेत. म्हणून त्यांनी निवड प्रक्रियेत भाग घेतला नाही.

नामनिर्देशन पत्र भरण्यात अडचणी

बुधवारी, गुहागर नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदाची निवडणूक आहे. उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सत्ताधारी गटाच्या ३ नगरसेविका अनुपस्थित होत्या. त्यामुळे या निवडणुकीसाठी संख्याबळाअभावी सत्ताधाऱ्यांना नामनिर्देशन पत्र भरण्यात अडचणी येणार आहेत. त्यावर शहर विकास आघाडी कोणता तोडगा काढणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

Tags: BJPDeputy Mayor ElectionGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsNagar PanchayatNCPNews in Guhagarshivsena
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.