Guhagar Taluka HSC Result, तालुक्याचा निकाल 91.72 टक्के
गुहागर : आज दुपारी बारावीचा निकाल जाहीर झाला. गुहागर तालुक्यातील 870 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते त्यापैकी 21 विद्यार्थ्यांनी डिस्टींक्शन मिळवले तर ग्रेड 1 मध्ये 96, ग्रेड 2 मध्ये 398 आणि उत्तीर्ण ग्रेडमध्ये 283 असे 798 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्याचा निकाल 91.72 टक्के लागला आहे. यावर्षी प्रथमच 12 वीचा निकाल मे महिन्याच्या सुरवातीला लागला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात CET च्या परीक्षा झाल्या. त्यांचाही निकाल मे अखेरीस विद्यार्थ्यांच्या हातात येईल. त्यामुळे जुनमध्ये विविध महाविद्यालयात प्रवेशासाठीची धावपळ पहायला मिळणार आहे. Guhagar Taluka HSC Result
तालुक्यातील विविध शाळांचे शाखानिहाय निकाल खालीलप्रमाणे आहेत.
(आपल्या पाल्याचा निकाल पहाण्यासाठी वरील लाल रंगाच्या ओळीवर क्लिक करा.)
गुहागर हायस्कुल
शास्त्र शाखा 160 पैकी 149 विद्यार्थी उत्तीर्ण (93.12 टक्के)
प्रथम क्रमांक – आदर्श महेश सोलकर (76.67 टक्के)
द्वितीय क्रमांक – सलोनी संजय मुकनाक (68.17 टक्के)
तृतीय क्रमांक – हेमांक्षी सुधीर भागडे (63.67 टक्के)
कला शाखा 24 पैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण (79.16 टक्के)
प्रथम क्रमांक – स्वानंदी संजय फुणगुसकर (48.17 टक्के)
द्वितीय क्रमांक – तन्वी अरूण साटले (46.83 टक्के)
तृतीय क्रमांक – श्रुतिका सुरेश घाणेकर (46.33 टक्के)
वाणिज्य शाखा 99 पैकी 73 विद्यार्थी उत्तीर्ण (73.73 टक्के)
प्रथम क्रमांक – ओम संतोष पारदळे (79.17 टक्के)
द्वितीय क्रमांक – प्रतिक्षा मदन सनगरे (68.17 टक्के)
तृतीय क्रमांक – कंगना निलेश पावरी (78.83 टक्के)
पालशेतकर विद्यालय, पालशेत
शास्त्र शाखा 36 पैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण (86.11 टक्के)
कला शाखा 19 पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण (94.73 टक्के)
वाणिज्य शाखा 24 पैकी 23 विद्यार्थी उत्तीर्ण (95.83 टक्के)
व्यावसायिक शिक्षण शाखा 13 पैकी 12 विद्यार्थी उत्तीण; (92.30 टक्के)
बाईत विद्यालय, आबलोली
शास्त्र शाखा 6 पैकी 6 विद्यार्थी उत्तीर्ण (100 टक्के)
कला शाखा 37 पैकी 36 विद्यार्थी उत्तीर्ण (97.29 टक्के)
वाणिज्य शाखा 40 पैकी 39 विद्यार्थी उत्तीर्ण (97.50 टक्के)
पाटपन्हाळे कनिष्ठ महाविद्यालय
शास्त्र शाखा 79 पैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण (93.67 टक्के)
प्रथम क्रमांक श्रावणी संतोष धामणस्कर (56.83 टक्के)
द्वितीय क्रमांक तेजस सुरेश साटम (55.50 टक्के)
तृतीय क्रमांक श्रद्धा दत्तात्रय टाणकर (55.33 टक्के)
कला शाखा 84 पैकी 80 विद्यार्थी उत्तीर्ण (95.23 टक्के)
प्रथम क्रमांक रिया विश्र्वास कुंभार (77.33 टक्के)
द्वितीय क्रमांक संजना संतोष चव्हाण (74.67 टक्के)
तृतीय क्रमांक तनुजा संदिप भेकरे (69.83 टक्के)
वाणिज्य शाखा 92 पैकी 87 विद्यार्थी उत्तीर्ण (94.56 टक्के)
प्रथम क्रमांक ऋतिका राजेश म्हसकर (79.50 टक्के)
द्वितीय क्रमांक पारस नरेश दिवाडकर (78.67 टक्के)
तृतीय क्रमांक विकेशा सुधाकर सकपाळ (75.33 टक्के)
शृंगारी उर्दु हायस्कुल शृंगारतळी
कला शाखा 23 पैकी 23 विद्यार्थी उत्तीर्ण (100 टक्के)
वाणिज्य शाखा 30 पैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण (90 टक्के)
वैद्य कनिष्ठ महाविद्यालय अंजनवेल
कला शाखा 31 पैकी 26 विद्यार्थी उत्तीर्ण (89.65 टक्के)
वाणिज्य शाखा 9 पैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण (100 टक्के)
तळवली हायस्कुल
कला शाखा 18 पैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण (100 टक्के)
वाणिज्य शाखा 19 पैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण (100 टक्के)
आयटीआय, गुहागर
तांत्रिक शाखा 19 पैकी 19 विद्यार्थी उत्तीर्ण (100 टक्के)
माध्यमिक विद्यालय
व्यावसायिक शिक्षण शाखा : 10 पैकी 10 विद्यार्थी उत्तीर्ण (100 टक्के)
