गुहागर : सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शहरातील जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला 25 बेड सीट्सची भेट देण्यात आली.
The city’s Jeevanshree Pratishthan, which works in the social and educational fields, donated 25 bed sheets to the Covid Center at Guhagar Rural Hospital.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपुर्ण गुहागर तालुक्यात अहाकार माजवला आहे. शेकडो कोरोना बाधित रुग्ण आणि मृतांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. प्रशासनाने गुहागर ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटर सुरू केले. याठिकाणी उपचार घेत असलेल्यांची संख्या अधिक असल्याने बेडवरील बेड सीट्स बदलणे क्रमप्राप्त होते. हे ओळखून नेहमीच गुहागर मध्ये सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या जीवनश्री प्रतिष्ठान संस्थेतर्फे गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरला 25 बेड सीट्सची भेट वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बलवंत, डॉ. निलेश ढेरे, परिचारिका अनिता मालप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष वरंडे, संचालक मनोज बोले, अरुण मालप, सिद्धिविनायक जाधव, नितीन बेंडल आदी उपस्थित होते.
जीवनश्री प्रतिष्ठानने याआधी सांगली पूरग्रस्त शाळांमधील 142 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, दरवर्षी दहावी, बारावी परीक्षेतील पहिले तीन उत्तीर्ण विद्यार्थी यांचा भेटवस्तू देऊन प्रोत्साहनपर गौरव, विविध स्पर्धेत यश संपादन केल्याचा सत्कार, गुहागर समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांचे प्राण वाचवणारा जीवरक्षक प्रदेश तांडेल याचा रोख पारितोषिक देऊन सत्कार, गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, रंगभरण स्पर्धा, कोविड योध्या आशा सेविका यांचा भेटवस्तू देऊन सन्मान, स्वछता मोहीम सहभाग, वृक्षारोपण कार्यक्रम, सामाजिक कामात खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदतीच हात ही संस्था देत आली आहे.