जयगडमधील मच्छिमार नौका नवेद 2 चा शोध सुरू
गुहागर ता. 31 : जयगड बंदरातून दिनांक 26/10/2021 रोजी सकाळी 5 वा. मासेमारी करण्याकरीता नवेद -2 नावाची बोट अद्याप जयगडला परतलेली नाही. या बोटीवर गुहागर तालुक्यातील सहा खलाशी आहेत. 30 आँक्टोबरला रात्री असगोली परिसरात खोल समुद्रात एक मृतदेह सापडला असून त्याची ओळख पटलेली नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. 31 आँक्टोबरला तटरक्षक दलामार्फत समुद्रात शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. Fishing Boat missing. Coast Guard, Police and Fisheries Department started Search Operation.


मुनताह टेमकर यांनी जयगड पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार जयगड अकबर मोहल्ला येथे रहाणारे नासीर संसारे यांच्या मालकीची नवेद 2 ही बोट 26 आँक्टोबरला सकाळी 5 वा मच्छीमारीसाठी समुद्रात गेली. नवेद – 2 बोटीवर गुहागर तालुक्यातील दगडू जनार्दन तांडेल, रा. साखरी आगर, गोकुळ तुकाराम नाटेकर, रा. साखर आगर, अनिल गोविंद आंबेकर रा. साखरी आगर, सुरेश धाकू कांबळे, रा. साखरी आगर, दत्तात्रय सुरेश झगडे, रा. अडुर, अमोल गोविंद जाधव, रा. मासू हे कर्मचारी होते. 28 आँक्टोबरला ही बोट जयगड बंदरात येणे अपेक्षित होते.
या बोटीवर वायरलेस द्वारे 26 आँक्टोबरला दुपारी 11.00 च्या सुमारास संपर्क झाला. त्यावेळी आम्ही दाभोळ उपर परिसरात असल्याचे बोटीवरुन सांगण्यात आले होते. मात्र त्यानंतर बोटीशी संपर्क झाला नाही.


त्यामुळे सदर बोट बेपत्ता झाली असे समजून पोलीस, तटरक्षक दल, आदी यंत्रणांनी शोध मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान 30 आँक्टोबरला सायंकाळी असगोली येथील समुद्रात किनार्यापासून सुमारे 25 वाव आत तटरक्षक दलाला एक मृतदेह सापडला. सदर मृतदेह तटरक्षक दलाने जयगड पोलीसांच्या ताब्यात दिला आहे. अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही.
तरी सदर बोटी बद्दल किंवा व्यक्तींनबद्दल काही माहिती मिळाल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन गुहागर पोलिसांनी केले आहे. पोलीस निरीक्षक जाधव 9922990741, पोलीस उपनिरीक्षक दिपक कदम 9870044518, प्रथमेश कदम 8983695622, राहुल फडतरे 8806656939.