मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
आबलोली : मालगुंड एज्युकेशन सोसायटी द्वारे संस्थेचे माजी अध्यक्ष, माजी मुख्याध्यापक कै. सदानंद बळीराम परकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार देते. हा पुरस्कार जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांना दिला जातो. या पुरस्कारासाठी ६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठवावेत. असे आवाहन मालगुंड एज्युकेशन सोसायटीने केले आहे.
मालगुंड एज्युकेशन सोसायटीतर्फे कै. सदानंद बळीराम परकर आदर्श शिक्षक पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम ५०००/- रुपये, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. संस्थेच्या वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रमात सन्मानपूर्वक आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पुरस्कारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी एका प्रतीत परीपूर्ण माहितीसह आपला प्रस्ताव सादर करावयाचा आहे. प्रस्तावांची छाननी करुन निवड समिती एका शिक्षकाचे नाव निश्चित करणार आहे. या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी ६ फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठवावेत. हे प्रस्ताव सेक्रेटरी, मालगुंड एज्युकेशन सोसायटी, मु. पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी, पिन कोड-४१५६१५ (भ्रमणध्वनी- ९४२३२९१०२८) या पत्त्यावर पाठवावेत. असे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.