गुहागर, ता. 17 : रत्नागिरी पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दादाजी भिकाजी बच्छाव 31 डिसें. 2022 रोजी सेवानिवृत्त झाले होते. मात्र, जात वैधतेच्या कारणास्तव त्यांना सेवानिवृत्तीवेतन मंजूर करण्यात आलेले नव्हते. या प्रकरणात “ऑफ्रोह’चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांच्या पाठपुराव्याने शेवटी सेवानिवृत्ती विषयक लाभ अदा करण्याचे आदेश पोलीस मुख्यालयातून झाल्यानंतर अखेर त्यांना पेन्शन व इतर लाभ मिळाले आहेत. Retired police officer got pension due to ‘Ofroh’
‘ऑफ्रोह’ ही नेहमीच कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांवर जागृतपणे पाठपुरावा करण्यासाठी तत्पर असते. ऑफ्रोहच्या माध्यमातून श्री.बच्छाव या सेवानिवृत्त पोलीस अधिका-यांना न्याय मिळवून देऊ शकलो, याचे समाधान असल्याचे ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष व प्रसिद्धीप्रमुख गजेंद्र पौनीकर यांनी सांगितले. Retired police officer got pension due to ‘Ofroh’


दादाजी बच्छाव यांनी पडताळणी समितीकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना समितीने वैधताप्रमाणपत्र दिले नाही. दरम्यान ते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर मात्र श्री. बच्छाव यांना सेवानिवृत्ती वेतन व सेवानिवृत्ती विषयक लाभ पोलीस अधिक्षक कार्यालयाकडून रोखून ठेवण्यात आले होते. तसेच पोलीस महासंचालक मुंबई यांजकडे मार्गदर्शन मागितले होते. हे प्रकरण ऑफ्रोहचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर पोलीस महासंचालक, मंत्रालय व जिल्हा पोलीस अधिक्षक यांना ऑफ्रोहने पत्र लिहून शासनाच्या 14 डिसें. 2022 च्या शासन निर्णयानुसार दादाजी बच्छाव यांना सेवा निवृत्तीवेतन व सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याची विनंती करण्यात आली. शेवटी शासन निर्णयातील तरतुदीनुसार व पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. बच्छाव यांना त्यांचे सेवानिवृत्तीनंतर रोखून धरण्यात आलेले सेवाविषयक व सेवानिवृत्ती विषयक लाभ अदा करण्याचे आदेश रत्नागिरी पोलीस मुख्यालयातून निघाले. Retired police officer got pension due to ‘Ofroh’