• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव

by Mayuresh Patnakar
January 30, 2021
in Old News
16 0
1
सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव
32
SHARES
90
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

आमदार भास्कर जाधव यांचे आयोजन, नावनोंदणी आवश्यक

गुहागर : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी आमदार भास्कर जाधव यांनी सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आले आहे. या महोत्सवामध्ये गुहागर विधानसभा क्षेत्रातील बेरोजगार युवक युवतींनी सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत जाधव यांनी केले आहे. कोरोनाच्या संकटांमुळे जाहिर झालेल्या टाळेबंदीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले. तसेच सुमारे चार महिने अनेक निर्बंध असल्याने औद्योगिक क्षेत्रासह अन्य संस्थांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या संधींचे प्रमाणही कमी आहे. हे लक्षात घेवून गुहागरचे आमदार, माजी मंत्री भास्कर जाधव यांनी सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. हा महोत्सव शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 13 फेब्रुवारीला चिपळूण तालुक्यातील रामपुरच्या मिलिंद विद्यालयात होणार आहे. शिवाई प्रतिष्ठान व यशस्वी ॲकेडमी फॉर स्किल्स  या दोन संस्थांच्या वतीने या महोत्सवाचे नियोजन करण्यात येत आहे. या संस्थाद्वारे राज्यातील विविध नामांकित कंपन्या, संस्थांचे प्रतिनिधी महोत्सवामध्ये सहभागी होतील.
गुहागर विधानसभा मतदारसंघातील (गुहागर, चिपळूण आणि खेड) बेरोजगार युवक युवतींसाठी सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव आहे. मात्र या महोत्सवात सहभागी होण्यासाठी 7 फेब्रुवारी पर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी एक लिंक देण्यात आली आहे. तेथे जावून ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेचे सदस्य विक्रांत जाधव यांनी केले आहे.

नावं नोंदणीसाठी खाली दिलेल्या लाल रंगातील सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव या शब्दांवर क्लिक करावे.

सुवर्ण भास्कर नोकरी महोत्सव

नाव नोंदणी अंतिम दिनांक : – ७ फेब्रुवारी २०२१

Tags: EmploymentGuhagarGuhagar NewsLatest NewsMarathi NewsMLA JadhavRecruiment CampUnemploymentआमदार भास्कर जाधवगुहागरगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या घडामोडीनोकरीबेरोजगारीमराठी बातम्यारोजगार
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.