नगरसेवक समीर घाणेकर; तांडेलचा गुहागर भाजपने केला सत्कार
गुहागर, ता. 21 : येथील समुद्रकिनाऱ्यावर दुर्घटना घडली असती तर सुरु झालेल्या अघटित घडले असते. पर्यटन व्यवसायालाही गालबोट लागले असते. मात्र प्रदेशने दुहेरी संकटातून गुहागरला वाचविले आहे. अशा शब्दात भाजपचे तालुका कोषाध्यक्ष व नगरसेवक समीर घाणेकर यांनी प्रदेश तांडेलच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. गुहागर भाजपतर्फे प्रदेश तांडेल याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी घाणेकर बोलत होते.
रविवारी 5 वाव खोल समुद्रात अडकलेल्या ८ पर्यटकांना प्रदेश तांडेल या जीवरक्षकांने समुद्रकिनाऱ्यावर सुखरुप आणले. त्याबद्दल गुहागर भाजपतर्फे प्रदेश तांडेल याचा सत्कार करण्यात आला. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे व ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी शाल व गुलाबपुष्प देवून प्रदेशचे कौतुक केले. यावेळी बोलताना तालुका कोषाध्यक्ष व नगरसेवक समीर घाणेकर म्हणाले की, कोरोनानंतर सुमारे 9 महिन्यांनी गुहागरमध्ये पर्यटन व्यवसायाला सुरवात झाली आहे. वर्षअखेरीस गुहागरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. रविवारी बनाना बोटीने खोल समुद्रात गेलेल्या पर्यटकांच्यावर आभाळ कोसळले होते. तसेच दुर्घटना घडली असती तर व्यवसायालाही फटका बसला असता. मात्र प्रदेशने जीवाची बाजी लावत पर्यटकांचा जीव वाचवला. शिवाय गुहागरच्या पर्यटन व्यवसायालाही दुर्घटनेचा स्पर्श होवू दिला नाही. त्याने कर्तव्य पार पाडताना दुहेरी संकटातून गुहागरची मुक्तता केली आहे.
प्रदेश तांडेलचा सत्कार करताना भाजपा तालुका अध्यक्ष नीलेश सुर्वे, सरचिटणीस सचिन ओक, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप गोरीवले, भाजयुमो तालुकाध्यक्ष संजय मालप, श्रीधर नाटेकर, नगरसेवक व शहराध्यक्ष प्रकाश रहाटे, अरुण रहाटे, सौ. मृणाल गोयथळे, सौ. भाग्यलक्ष्मी कानडे, भाजयुमो शहराध्यक्ष मंदार पालशेतकर, गणेश भिडे, सागर काटदरे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.