गुहागर : शृंगारतळी बाजारपेठेत महामार्गाचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. या कामाची नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी पहाणी केली. त्यावेळी व्यापाऱ्याच्या अडीअडचणी त्यांनी समजून घेतल्या. तसेच धुळीचा त्रास होवू नये म्हणून ठेकेदाराला रस्त्यावर पाणी मारण्याची सूचना यावेळी आमदार जाधव यांनी केली. तीन पदरीकरणाचे कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
शृंगारतळी बाजारपेठत सध्या रस्त्याचे कामाने वेगाने घेतला आहे. वेळंब फाटा येथील पुल तोडण्यात आला आहे. वेळंब फाटा ते विनायका ऑटोमोबाईल दरम्यान गटाराचे काम सुरु आहे. तर गुहागरच्या बाजुच्या पुलावर स्लॅब घालून झाला आहे. बाजारपेठेतही तीन पदरीकरणाचे काम सुरू आहे. या सर्व कामाची पहाणी नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी केली. यावेळी व्यापारी, ग्रामस्थ यांच्याबरोबर चर्चा करुन रस्त्याचे काम करताना होणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. ठेकेदार शिवाजी माने व अधिकाऱ्यांना या अडचणी सोडविण्यास सांगितले.