• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 June 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरजीपीपीएलमध्ये पीयुसी चाचणी शिबिर

by Mayuresh Patnakar
June 7, 2022
in Bharat
16 0
0
Environment Day in RGPPL

Environment Day in RGPPL : वाहनचालकाला पीयुसी प्रमाणपत्र देताना असीमकुमार सामंता

31
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 07 :  तालुक्यातील रानवी येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीद्वारे प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र (Pollution Under Control Certificate) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने हे शिबिर (Environment Day in RGPPL) घेण्यात आले. वाहनांमधुन होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण (carbon emission) सर्वांना समजावे. परिवहन कायद्यानुसार बंधनकारक असलेले पीयुसी प्रमाणपत्र सर्वांजवळ असावे. हा या शिबिराचा उद्देश होता.

रविवारी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) आरजीपीपीएल (RGPPL) निवासी वसाहतीमधील सावित्री भवनच्या प्रांगणात प्रदुषण नियंत्रण प्रमाणपत्र (Pollution Under Control Certificate) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी शृंगारतळी येथील आर.टी.ओ. मान्यता प्राप्त सद्गुरू ऑटोज पीयुसी सेंटर यांनी मोलाचे सहकार्य केले. शिबिराचे उद्घाटन आरजीजीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता यांच्या हस्ते करण्यात आले. (Environment Day in RGPPL)

या शिबिरामध्ये आरजीपीपीएलमधील खासगी तसेच कंपनीच्या वापराकरीता ठेकेदारी पध्दतीने घेण्यात आलेल्या वाहनांची ऑनलाइन प्रदुषण (Pollution) चाचणी करण्यात आली. ज्या वाहनांमधील कार्बन उत्सर्जनाचे (carbon emission) प्रमाण शासनाने निश्चित केलेल्या प्रमाणात होते त्यांना सद्‌गुरू ऑटोज्‌ कडून आरटीओ मान्यताप्राप्त  पीयुसी  (PUC)  प्रमाणपत्रे (Certificate) देण्यात आली. (Environment Day in RGPPL) प्रमाणपत्राचे वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीम कुमार सामंता  यांनी केले. यावेळी कंपनीचे जनरल मॅनेजर हरबनसिंग बावा, सहाय्यक व्यवस्थापक कुरूप, मुख्य वित्त अधिकारी अजय शर्मा, सुरक्षा विभाग प्रमुख लिंडा स्कारिया आदी उपस्थित होते. (Environment Day in RGPPL)

Tags: carbon emissionEnvironment Day in RGPPLGuhagar NewsMarathi NewsNews in MarathiPollution Under Control CertificatePUCRgpplVehiclesWorld Environment Dayकार्बन उत्सर्जनगुहागरगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याजागतिक पर्यावरण दिनप्रदुषणमराठी बातम्यावाहन
Share12SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.