राष्ट्रीय सेवा समिती उभारणार नवी सुसज्ज वास्तू
रत्नागिरी, ता. 19 : 1989 मध्ये सन्मीत्र नगर येथे राष्ट्रीय सेवा समितीच्या माध्यमातून विद्यार्थिंनींसाठी वसतीगृह सुरु करण्यात आले. या वसतीगृहाच्या ठिकाणी बदलत्या काळानुरुप वाढत्या गरजा लक्षात घेवून विद्यार्थीनींसाठी सुसज्ज व सेल्फ कंटेंड १८ खोल्या व सभागृहाचे नवे वसतीगृह बांधण्यात येत आहे. या नूतन वास्तूचा भूमिपुजन व पायाभरणी कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. Girls Hostel’s New Building

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच महावीर जयंती या शुभदिनी भुमिपूजन व पायाभरणीचा कार्यक्रम झाला. या सोहळ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत सहसंघचालक अर्जुन तथा बाबा चांदेकर, विभाग कार्यवाह प्रसाद आगवेकर, माजी आमदार बाळ माने, प्रभागाचे नगरसेवक निमेश नायर, फिनोलेक्स कंपनीचे काकडे, चिवटे, रत्नागिरीच्या ग्रामदेवता संस्थानचे ट्रस्टी मुन्ना सुर्वे, वसतिगृहासाठी जमीन देणगी देणारे विठ्ठल लिमये व विजय लिमये कुटुंबीय, राष्ट्रीय सेवा समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संघ परिवारातील हितैशी उपस्थित होते. Girls Hostel’s New Building

जिल्हाभरातून रत्नागिरीत शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची निवास व्यवस्था गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतीगृहात होत असे. अन्य शैक्षणिक संस्थांचीही मुलींसाठी वसतीगृहे होती. मात्र शिक्षणासाठी येणाऱ्या मुली आणि वसतीगृह यांचे प्रमाण व्यस्त होते. त्यामुळे राष्ट्रीय सेवा समितीने 1989 मध्ये सन्मीत्रनगर इथे मुलींसाठी वसतीगृह सुरु केले. आजपर्यंत या वसतीगृहात सुमारे 900 विद्यार्थीनी शिक्षणासाठी राहील्या होत्या. याच ठिकाणी नव्याने विद्यार्थीनींसाठी सुसज्ज व सेल्फ कंटेंड १८ खोल्या व सभागृह असणारे वसतिगृह उभारण्याचे संस्थेने निश्चित केले आहे. या नूतन वास्तुच्या भुमिपूजन आणि पायाभरणी कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, तसेच महावीर जयंती या शुभदिनी झाला. Girls Hostel’s New Building

या कार्यक्रमात मा. प्रांत सहसंचघालक अर्जुन तथा बाबा चांदेकर म्हणाले की, येथे शिकलेल्या बहुतांशी मुलींनी शिक्षणाबरोबरच या वसतीगृहातून मिळालेल्या संस्कारांचा उपयोग समाजातील विविध प्रश्र्न, समस्या सोडविण्यासाठी आपापल्या परिने करत आहेत. राष्ट्रीय सेवा समितीलाही हेच अपेक्षित आहे. म्हणून भविष्यात समाजोपयोगी कार्य करण्यास सक्षम विद्यार्थिनी तयार होऊन बाहेर पडतील. असा विश्र्वास वाटतो. Girls Hostel’s New Building
संस्थेचे अध्यक्ष संतोष पावरी म्हणाले की, राष्ट्रीय सेवा समिती गेली ३२ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात विविध सेवा कार्यांच्या माध्यमातून कार्यरत आहे. गोळवली संगमेश्वर येथील ग्रामविकास व गोसंवर्धन प्रकल्प, झाडगाव रत्नागिरी येथील आदर्श विद्यार्थी वसतिगृह, झाडगाव येथील योग प्रशिक्षण केंद्र अशा विविध उपक्रमातून समाजाच्या गरजा लक्षात घेत संस्थेचं कार्य सुरू आहे. या उपक्रमांसाठी अनेक व्यक्ती संस्था भरीव योगदान देत आहेत. त्यांची माहितीही संतोष पावरी यांनी दिली. तसेच येत्या ऑगस्ट महिन्यापर्यंत संस्थेची वस्तू विद्यार्थिनी निवासासाठी पूर्ण करण्याचा मनोदय व्यक्त केला. Girls Hostel’s New Building
