• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आमदार जाधव यांचा आरजीपीपीएल अधिकाऱ्यांना दणका

by Mayuresh Patnakar
January 30, 2021
in Old News
16 0
0
आमदार जाधव यांचा आरजीपीपीएल अधिकाऱ्यांना दणका
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्थानिक कर्मचाऱ्यांना दिलासा, प्रवेश पास प्रकरणाचीही घेतली दखल

गुहागर : आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना  दणका दिला. त्यामुळे अनेक वर्ष नोकरीवर असणाऱ्या स्थानिकांना काढून टाकण्याचे प्रयत्न आरजीपीपीएल प्रशासनाला थांबवावे लागले आहेत.  स्थानिक कर्मचाऱ्यांचे प्रश्र्न मार्गी लावण्यासाठी युपीएल आणि आरजीपीपीएल अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
अंजनवेल (ता. गुहागर) येथील रत्नागिरी गॅस आणि वीज कंपनीमध्ये स्थानिक २८ कर्मचारी गेल्या १५-२० वर्षांपासून कार्यरत आहेत. युपीएल कंपनीच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या या कर्मचाऱ्यांना कंपनीने कायमस्वरूपी प्रवेश पास दिले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी हे पास कंपनीने ताब्यात घेवून त्यांना तात्पुरत्या स्वरूपाचे पास दिले. या कर्मचाऱ्यांना सुरूवातीला मिळणाऱ्या सुविधाही कंपनीने हळूहळू कमी केल्या. त्यामुळे कंपनी आता कामावरून कमी करणार अशी शंका व भीती या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली होती.  15-20 वर्षांनंतर नोकरी गेली तर काय करायचे, संसाराची घडी विस्कटेल. इतक्या वर्षांनी अन्य ठिकाणी नोकरी कशी मिळणार, अशा चिंता कर्मचाऱ्यांना भेडसावत होत्या. तर दुसरीकडे अन्य राज्यातून कर्मचाऱ्यांची भरती केली जात असल्याचे निदर्शनास येत होते. त्यामुळे चिंतेत सापडलेल्या या कर्मचाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांची भेट घेवून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती.
या संदर्भात आमदार भास्कर जाधव यांनी आरजीपीपीएल प्रशासनाला बैठक बोलावण्यास सांगितले होते. ही बैठक 28 जानेवारीला कंपनीमध्ये पार पडली. या बैठकीला आरजीपीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक असिमकुमार सामंता यांच्यासह जॉन फिलिप, एस. एस. बावा, सी. एस. थॉमस, डी. सुरेश, विकास सिंग आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  या बैठकीच्या प्रारंभापासूनच आमदार भास्कर जाधव स्थानिक कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले होते. इतकी वर्ष प्रामाणिकपणे काम करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना  तुम्ही कमी करणार आहात का ?, बाहेरून कर्मचारी भरती करून त्यांना लाख-दीड लाख रूपये पगार दिला जातो. मग स्थानिक कर्मचाऱ्यांचा पगार का वाढवला जात नाही ?  बोनस देताना भेदभाव का केला जातो ?,  त्यांना मिळणाऱ्या सुविधा का कमी केल्या  गेल्या ? अशा अनेक प्रश्र्नांचा भडिमार त्यांनी केला. कंपनी महाराष्ट्रात असूनदेखील एकही अधिकारी मराठी का नाही ?  याचा कंपनी प्रशासनाला जाब विचारला.
आमदार जाधव यांचा रूद्रावतार पाहून आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांनी शरणागती पत्करली. व्यवस्थापकीय संचालक असिमकुमार सामंता यांनी एकाही स्थानिक कर्मचाऱ्याला कमी केले जाणार नाही. त्यांचा पगारही कमी केला जाणार नाही. असे आश्वासन दिले. प्रवेश पास बदलण्यात आल्याच्या आणि त्यावर मुदत टाकण्यात आल्याच्या प्रकाराची गंभीरपणे दखल घेत असल्याचेही सामंता यांनी सांगितले.
हे स्थानिक कर्मचारी युपीएल कंपनीच्या उपठेकेदाराच्या माध्यमातून  नेमले जातात. या उपठेकेदार बद्दलही अनेक तक्रारी असल्याचे बैठकीत समोर आले. त्यामुळे भविष्यात या कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होवू नये. आणि त्यांचे अन्य प्रश्न सोडविण्यासाठी आरजीपीपीएल, युपीएल कंपनी यांचेसमवेत बैठक आयोजित करण्याची सूचना यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी आरजीपीपीएलच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेश नाटेकर, विनायक मुळे, माजी नगराध्यक्ष जयदेव मोरे, माजी उपनगराध्यक्ष दिपक कनगुटकर,  विनायक जाधव, शिवसेना शहरप्रमुख नीलेश मोरे, सचिन जाधव, राज विखारे आदी उपस्थित होते. बैठकीनंतर कंपनीच्या आवारात जमून सर्व स्थानिक कर्मचाऱ्यांनी आमदार भास्कर जाधव यांचे आभार मानले.

Tags: GuhagarGuhagar NewsLatest NewsLocal EmployeeMarathi NewsMLA Bhaskar JadhavRgpplUPLआमदार भास्कर जाधवआरजीपीपीएलगुहागरगुहागर न्यूजगुहागरच्या बातम्याताज्या घडामोडीमराठी बातम्यायुपीएलस्थानिक कर्मचारी
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.