डॉ. आठल्ये : पहिला डोस 64.61% तर दुसरा डोस 28.09% लोकांनी घेतला
रत्नागिरी, ता. 29 : कोरोना (Covid) लसीकरण (Vaccination) मोहिमेंतर्गत पहिला आणि दुसरा डोस मिळून दहा लाख लसीकरणाचा टप्पा रत्नागिरी जिल्ह्याने ( Ratnagiri District ) पार केला. १८ वर्षावरील १० लाख ८१ हजार ९०० जणांच्या लसीकरणाचे जिल्ह्याचे उद्दिष्ट आहे. त्यात पहिला डोस ६ लाख ९८ हजार ९९५ आणि दुसरा डोस ३ लाख ३ हजार ९२२ जणांनी घेतला आहे.
सध्या मात्रा आणि नागरिक यांचा मेळ बसू लागला आहे. आरोग्य विभागाने १८ वर्षांवरील नागरिकांसाठी १० लाख ८१ हजार ९०० लस लागणार असल्याचा अहवाल पाठवला होता. त्यानुसार जानेवारी २०२१ पासून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. ऑगस्ट महिन्यापासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होताच लसीकरणाचा वेग वाढला.
२७ सप्टेंबरला १० लाख लसीच्या मात्रांचे वितरण पूर्ण झाले. या लसीकरणात कोविशिल्डचा पहिला डोस ५ लाख ७७ हज़ार ४६३ तर दुसरा डोस २ लाख १९ हजार ९७७ जणांनी घेतला. कोवॅक्सिनचा पहिला डोस १ लाख २१ हजार ५३२ तर दुसरा डोस ८३ हजार ९४८ जणांनी घेतला.
एकूण लक्षांकापैकी ६ लाख ९८ हजार ९९५ जणांनी म्हणजेच ६४.६१ टक्के जणांनी पहिला डोस आणि ३ लाख ३ हजार ९२२ जणांनी म्हणजेच २८.०९ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी दिली.
वर्गवारी |लक्ष्य| पहिला डोस | दुसरा डोस |
फ्रंटलाईन वर्कर | २१,६३६ | १८,०५७ | १४,५८८
आरोग्य कर्मचारी | ३५,७५० | ३८,३४७ | ३२,४८६
१८ ते ४४ वयोगट | ६,६५,९०० | २,९१,५८५ | ६८,३९०
४४ ते ६० वयोगट | २,४३,९०० | १,९६,७९७ | १,००,५३३
६० वर्षावरील | १,७२,१०० | १,५४,२०९ | ८७,९२५