Tag: Latest News on Guhagar

Sahaj Rajyoga Camp at Guhagar

गुहागर येथे सहज राजयोग शिबिर

प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय यांच्यातर्फे साळवी कॉम्प्लेक्स, ढेरे हॉस्पीटलच्या वरती गुहागर, ता. 13 : प्रजापती ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, गुहागर सेवाकेंद्र यांच्यातर्फे मोफत निदान शिबीर आयोजित केले आहे.  हे  ...

रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त स्वा. सावरकर विचार जागरण सप्ताह रंगणार आहे. वीरभूमी परिक्रमेअंतर्गत हा सोहळा येत्या २१ ते २८ मे दरम्यान होणार आहे. यानिमित्ताने वक्तृत्व, रांगोळी स्पर्धा, पथनाट्ये, वाळूशिल्प यांसह विनायका रे हा संगीतमय कार्यक्रम, शोभायात्रा आणि सहभोजन कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले आहे. या सर्व कार्यक्रमांकरिता पतितपावन मंदिर संस्था, भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विठ्ठल मंदिर देवस्थान यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे सहकार्य लाभत आहे. नियोजनाकरिता समितीही गठित करण्यात आली आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri या सप्ताहाची सुरवात २१ मे रोजी सकाळी ९ वाजता स्वा. सावरकर चौक ते हनुमान मंदिर, शिरगाव इथपर्यंत बाईक रॅलीने करण्यात येणार आहे. यात शेकडो बाईकस्वार सहभागी होतील. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये त्या तिघी (स्वातंत्र्यकुंडातील अज्ञात समिधा) हे सावरकर कुटुंबातील महिलांच्या त्यागाचे मूर्तीमंत प्रतिक दाखवणारे नाट्य सादर होईल. पुण्यातील अभिव्यक्त संस्थेतर्फे याचे सादरीकरण होणार आहे. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन पतितपावन मंदिरात सुरू होईल. २३ मे रोजी सकाळी ११ वाजता आठवडा बाजार व नंतर स्वा. सावरकर चौक येथे देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी वीर सावरकरांवर आधारित पथनाट्य सादर करतील. २४ मे रोजी सकाळी ११ वाजता विठ्ठल मंदिर येथे वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri गुरुवारी (ता. २५) रेल्वेस्टेशन आणि मारुती मंदिर चौक येथे पथनाट्य सादर केले जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी ६.३० वाजता राष्ट्रीय कीर्तनकार हभप चारुदत्त आफळेबुवा यांचे कीर्तन साळवी स्टॉप-नाचणे लिंक रोड येथील ओम साई मित्रमंडळाच्या हॉलमध्ये होणार आहे. स्वा. सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार यावर कीर्तनकार आफळे विवेचन करणार आहेत. २६ मे रोजी वाळूशिल्प भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर शिल्पकार अमित पेडणेकर साकारणार आहेत. सायंकाळी ६ वाजता त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. सप्ताहात असे विविध कार्यक्रम होत असताना स्वा. सावरकरांच्या गीते, कवितांवर आधारित विनायका रे... हा संगीतमय कार्यक्रम २७ मे रोजी सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर नाट्यगृहात (वातानुकूलित) रंगणार आहे. लिटिल चॅंप फेम आणि रत्नागिरीचा सुपुत्र गायक प्रथमेश लघाटे व आघाडीची गायिका मुग्धा वैशंपायन वीर सावरकरांचे गीते सादर करणार आहेत. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri वीर सावरकरांची १४० वी जयंती येत्या २८ मे रोजी आहे. या जयंतीचे औचित्य साधून आठवडाभर विविध कार्यक्रम होत असून त्याची सांगता २८ मे रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी ९ वाजता मध्यवर्ती कारागृह स्वा. सावरकर स्मारक येथून जयस्तंभ, एसटी स्टॅंड, राम आळी, गोखले नाका, गाडीतळ मार्गे पतितपावन मंदिर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. यामध्ये सुमारे दहा संस्थांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संस्थांसह मंदिर संस्था, ज्ञाती संस्थाही यात सहभागी होणार आहे. ही शोभायात्रा विराट होईल, याकरिता संयोजकांनी तयारी केली आहे. ही शोभायात्रा पतितपावन मंदिरात पोहोचली की तेथे ११.३० वाजता सहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. शोभायात्रेमध्ये पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा हेसुद्धा सहभागी होणार आहेत. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri या सर्व कार्यक्रमांना रत्नागिरीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालय, पतितपावन मंदिर संस्था, श्री भागोजीशेठ कीर ट्रस्ट आणि विवेक व्यासपीठ यांच्यावतीने करण्यात येत आहे. Savarkar Thought Awakening Week in Ratnagiri

रत्नागिरीत सावरकर विचार जागरण सप्ताहाचे आयोजन

वीर सावरकरांच्या १४० व्या जयंतीनिमित्त २१ ते २८ मे रोजी कार्यक्रम रत्नागिरी, ता.13 : महाराष्ट्र शासनाचे पर्यटन संचालनालय आणि मुंबईतील विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या ...

Youth in Adur committed suicide

अडूरमधील तरुणाने केली आत्महत्या

गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अडुर पड्याळवाडीतील 29 वर्षांच्या तरुणाने 11 मे रोजी रात्री गळफास लावून आत्महत्या केली आहे. सध्या पड्याळवाडीत सत्यनारायणाची महापुजा व विविध कार्यक्रम 10 मे पासून सुरु ...

Amrit Mahotsav of Sade Jambhari School

सडे जांभारी शाळेचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

गुहागर ता. 12 : जि.प.आदर्श शाळा सडे जांभारी नं-२ केंद्र आबलोली येथे शाळेचा अमृतमहोत्सव सोहळा दि. ८/०५/२०२३ रोजी संपन्न झाला. या निमित्ताने विविध कार्यक्रम व साफुदपा डोनर सन्मान, माजी शिक्षक ...

Two lakh women traveled by ST

दोन लाख महिलांनी एस.टी.ने केला प्रवास

रवींद्र वणकुद्रे, गुहागर आगाराचे भारमान वाढले गुहागर, ता. 12 : गुहागर आगारातील एस.टी.मधुन मार्च महिन्यात 1 लाख महिलांनी प्रवास केला तर एप्रिल महिन्यात ही संख्या 2.5 लाखाहून अधिक होती. तर ...

Online Job Fair

ऑनलाईन रोजगार मेळावा

पंडित दिनदयाल उपाध्याय; दि. 26 मे 2023 रोजी गुहागर ता. 12 : रत्नागिरी जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांकरिता पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन 26 मे 2023 रोजी करण्यात आले आहे. जिल्हयातील सर्व खाजगी आस्थापनांनी, त्यांचेकडील रिक्त ...

Election of Taluka Shiv Sena Secretary Agre

कार्यकर्त्यांचा विश्र्वास सार्थ ठरला

दिपक कनगुटकर, शिवसैनिकांचे केले अभिनंदन गुहागर, ता. 12 : मा. एकनाथ शिंदेच्या नेत्तृत्त्वातील शिवसेना हीच बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना असल्याचा विश्र्वास कार्यकर्त्यांनी  दाखवला. गुहागर विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिक याच विचारांसोबत आले. आजच्या न्यायालयाच्या निर्णयाने आमचा सर्वांचा विश्र्वास सार्थ ठरला आहे. अशी प्रतिक्रिया शिवसेना तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर यांनी गुहागर न्यूजला दिली. The faith of Shiv Sena workers was justified सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिपक कनगुटकर म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेब यांच्यासह माजी आमदार रामदास भाई ...

गुहागर मराठी बातम्या, Updates of Guhagar, Latest News on Guhagar, Guhagar News in Marathi, Guhagar News, Marathi News, मराठी बातम्या, News in Guhagar, ताज्या बातम्या, लोकल न्युज, Guhagar, टॉप न्युज, Latest News, Latest Marathi News,

कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा

नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन गुहागर ता. 12: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. कधी कडाक्याचं ऊन तर कधी वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होत आहे. महिन्याभरापासून महाराष्ट्रातील ...

Jagdamba will bring Talwar back from London

लंडनमधून जगदंबा तलवार परत येणार?

गुहागर ता. 12: छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंबा तलवार ब्रिटनमधून भारतात परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांना लागेल ती सर्व मदत करण्याचा निर्णय लंडनमध्ये असणाऱ्या ...

Sarpanch and deputy sarpanch caught taking bribe

सरपंच व उपसरपंचांना लाच घेताना पकडले

राजिवलीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गुहागर ता. 12: संगमेश्वर तालुक्यातील राजिवली ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचांना 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या घटनेने रत्नागिरी ...

Records in turtle conservation but failure in breeding

केवळ 7200 कासवांची पिल्ले समुद्रात

संवर्धनात विक्रम पण प्रजननात अपयश मयूरेश पाटणकर,गुहागर, ता. 10 : येथील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी विक्रमी यश मिळाले. आजवरच्या इतिहासात प्रथमच 200 हून अधिक मादी ऑलिव्ह रिडले कासवांची 23 हजारपेक्षा जास्त अंडी कासवमीत्रांनी संवर्धित केली. मात्र 10 मे पर्यंत सुमारे 7200 कासवांची पिल्लेच समुद्रात सोडण्यातआली. त्यामुळे प्रजनन दरात प्रचंड घट झाल्याचे समोर येत आहे. याची कारणे शोधण्याचे आव्हान वन विभाग, कांदळवन प्रतिष्ठान आणि कासव मित्रांसमोर उभे ठाकले आहे. Records in turtle conservation but failure in breeding गुहागरमधील कासव संवर्धन मोहिमेला यावर्षी सर्वाधिक यश मिळाले. गुहागरच्या साडेसात किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर 219 मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी सापडली. यामधुन प्रथमच 23 हजार 78 अंडी कासव संवर्धन केंद्रात संरक्षित करण्यात आली. याचे मुख्य कारण म्हणजे कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभागाने गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर देखरेखीसाठी वाढवलेले मनुष्यबळ. यावर्षी प्रथमच 6 कासवमित्रांची नेमणूक संवर्धन आणि संरक्षण मोहिमेसाठी करण्यात आली होती. Records in turtle conservation but failure in breeding कासवांची अंडी संरक्षित केल्यानंतर त्यातून कासवांची पिल्ले बाहेर पडण्याचे प्रमाण हे नेहमीच कमी असते. गुहागरमधील कासव संवर्धनाचा विचार केल्यास दरवर्षी हे प्रमाण 42 ते 47 टक्के इतकेच राहीले आहे. मात्र यावर्षी 10 मे अखेर 23 हजार 78 अंड्यापैकी सुमारे 7200 अंड्यांमधुन पिल्लांचा जन्म झाला. हे प्रमाण केवळ 29 टक्के इतकेच आहे. 219 घरट्यांपैकी आता केवळ 14 घरट्यातून पिल्ले बाहेर  पडणे  शिल्लक आहे. ...

The first solar powered village in the state

सौर ऊर्जेवर चालणारे गाव मावळमधील पुसाणे

मावळमधील पुसाणेमध्ये राज्यातील पहिला प्रयोग गुहागर, ता. 11 : ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा महावितरणच्या मर्जीने चालते कारण की आठ ते बारा तास ग्रामीण भागातील बत्ती गुल असते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,आणि ...

Satyanarayana Pooja at Guhagar Kamlakar Hall

किरण कला मंडळातर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा

दि. 13 मे रोजी कमलाकर सभागृह, लोखंडे विभाग येथे विविध कार्यक्रम गुहागर, ता. 11 : किरण कला मंडळ, ग्रामस्थ व मुंबई लोखंडे विभागतर्फे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. ...

The drug smuggler was detained by the police

अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

रत्नागिरी, ता. 11 : ब्राऊन हेरॉईन या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका तरूणाला रत्नागिरी शहर पोलिसांच्या पथकाने गस्तीदरम्यान ताब्यात घेतले आहे. ही कारवाई ९ मे रोजी रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरात ...

Dak Adalat on 15th June

डाक अदालत 15 जून रोजी

रत्नागिरी दि.11 : अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा 15 जून 2023 रोजी अधिक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी 415612 येथे सकाळी 11.30 वाजता डाक अदालत आयोजित ...

Women's Democracy Day in Ratnagiri

रत्नागिरीत महिला लोकशाही दिन 15 मे रोजी

रत्नागिरी दि.10 : जिल्हास्तरावर दर महिन्याला तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सभागृहात "जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन" साजरा होतो. यावेळी अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. व ...

A Review of Pre-Kharip Season Preparations in Konkan

कृषि मंत्र्यांनी घेतला खरीप हंगामपूर्व तयारीचा आढावा

शेतकऱ्यांना बियाणे, खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या; कृषी मंत्री अब्दुल सत्तार गुहागर, ता. 10 : कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन ...

India's operation Cauvery complete

भारताचे ऑपरेशन कावेरी पूर्ण

17 विमाने व 5 जहाजांनी 3862 भारतीय मायभूमीत परतले गुहागर, ता. 10 : सुदानमध्ये (Sudan) सुरु असलेल्या हिंसाचारात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) सुरु केले होते. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण ...

Corona wave is over

कोरोनाची लाट संपली

WHO ची घोषणा; जागतिक आणीबाणी हटवली गुहागर, ता. 10 : मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट आता संपली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली आहे. ...

Guhagar by-election unopposed

ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मद्य विक्रीस पूर्णतः बंदी

रत्नागिरी, दि. 09 : जिल्ह्यामधील मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या तालुक्यातील १४८ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होणार आहे. ही  निवडणूक २१० रिक्त सदस्य पदे व ८ थेट ...

Page 143 of 206 1 142 143 144 206