खासदार तटकरे, महिनाभरात अडचणी जाणून घेणार
गुहागर, ता. 26 : रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोकणच्या विकासासाठी तो पूर्ण क्षमतेने चालणे आवश्यक आहे. हा प्रकल्प बंद पडू देणार नाही. अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी आज गुहागरमधील पत्रकारांना दिली.
ओएनजेसीकडून अपुरा गॅस पुरवठा होत असल्याने 1964 मेगावॅटची क्षमता असलेल्या आरजीपीपीएलमध्ये सध्या अनियमितपणे केवळ 200 मेगावॅट वीज निर्मिती सुरु आहे. हा गॅस पुरवठा देखील अनेकवेळा होत नाही. वीज निर्मितीचे कामकाज थांबते. असे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरजीपीपीएल कंपनी बंद पडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.
खासदार सुनील तटकरे महाराष्ट्राचे उर्जा मंत्री असताना केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनातून केंद्र सरकारने रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्प या कंपनीची स्थापना केली. त्यामुळे नव्या कंपनीकडे मालमत्तेचे हस्तांतरण करण्यापासून अनेक गोष्टींची तपशीलवार माहिती तटकरे यांना आहे. राज्याची वीज निमिर्ती क्षमता, महाजनकोच्या प्रकल्पांची स्थिती, वीज दरांमागील अर्थकारण हा गोष्टीही खासदार तटकरे यांना ज्ञात आहेत. त्यामुळे आरजीपीपीएलवरील अपुऱ्या गॅस पुरवठ्याचे संकट दूर व्हावे म्हणून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मध्यंतरी खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली होती.
गुहागरच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी यासंदर्भात खासदारांना प्रश्र्न विचारला. तेव्हा तटकरे म्हणाले की, पुढील महिनाभरात आरजीपीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक करेन. त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत. परदेशातून येणाऱ्या गॅसवर वीज उत्पादनाचा दर काय राहील. कोणत्या खाजगी क्षेत्राला या दरात वीज परवडेल. आदी बाबी हे जाणून घेईन. या विषयांचे केंद्रीय मंत्री हरदिप पुरी यांची भेट घेवून निश्चित यातून मार्ग काढू. आरजीपीपीएल प्रकल्पामुळे दापोली, गुहागर या दोन तालुक्यातील अनेकांना रोजगार मिळत आहे. असा प्रकल्प बंद पडणार नाही याची काळजी घेऊ. अशी ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
आरजीपीपीएल का बंद पडेल हे वाचण्यासाठी खालील बातमीवर क्लिक करा.
आरजीपीपीएलचे भविष्य अंधारमय

The Ratnagiri Gas and Power Project is an important project. For the development of Konkan, it is necessary to run at full capacity. This project will not be shut down. This testimony was given by MP Sunil Tatkare to the journalists in Guhagar today. RGPPL, which has a capacity of 1964 MW, is currently generating only 200 MW of electricity irregularly due to insufficient gas supply from ONGC. This gas supply also does not happen often. Therefore once again condition created as the closure of the RGPPL company.
