अथांग ते उत्तुंग असा आपला रत्नागिरी जिल्हा पर्यटन पूरक बाबींनी ओतप्रोत भरलेला आहे. परंतु या बाबींची आपल्याला पुरेशी कल्पना नाही की या स्थळांच्या संदर्भातील एकत्रित माहिती कुठे उपलब्ध आहे किंवा कसे? अर्थात याचा परिणाम रत्नागिरी जिल्हा पर्यटन क्षेत्रावर होत आहे. शासन प्रशासकीय पातळीवर पर्यटन पूरक विकास योजना राबविताना योग्य माहिती अभावी अडथळे निर्माण होतात. काही ठराविक प्रसिद्ध ठिकाणांसोबत गावातील सर्व छोट्या स्थळांवर लक्ष देणे गरजेचे आहे. जेवढी स्थळे अधिक तेवढा पर्यटक या ठिकाणी अधिक वेळ थांबेल. या सर्व बाबींचा विचार करता आपल्याला जिल्ह्यातील पर्यटन पूरक स्थळे आणि बाबींची एकत्रित माहिती संकलन होणे गरजेचे बाब आहे.
यासाठी सदर माहिती संकलन फॉर्म नव्याने तयार केला आहे.
या माहिती संकलनातून बरंच काही साध्य करता येईल. त्याच प्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती आपणा सर्वांना एकत्रित पणे उपलब्ध होईल आणि शासन प्रशासकीय पातळीवर विकास योजनांचे लाभ घेण्यासाठी करता येईल.
आपणा सर्वांचे सहकार्य यासाठी अपेक्षित आहे.
आपण फक्त एवढंच करुया..
•?सोबतची गुगल लिंक ओपन करुया.
•? आपणासमोर एक फॅार्म येईल. तो तिथल्या तिथेच भरुन सबमिट करायचा आहे.
• ?एक फॅार्म- एक स्थळ हा नियम पाळूया.
•? एक व्यक्ती कितीही फॅार्म भरु शकते.
•? ही लिंक आपापल्या तालुक्यातील पर्यटन प्रेमींनाच पाठऊया.
• ?कदाचित एकाच स्थळाची माहीती अनेक व्यक्ती भरतील. काळजी करु नका. आम्ही त्याची सुयोग्य पद्धतीने छाननी करुन सर्व मााहीतीचे योग्य संकलन करु.
•? आपल्याला माहीती असलेल्या स्थळांची माहीती नक्की पाठवा. कोणीतरी दुसरा पाठवेल या भरवशावर नको राहूया.
चला तर मग लागुया कामाला! ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार सर्व जिल्ह्यालाच पर्यटनाच्या नकाशावर नेउया!
धन्यवाद
आपणा सर्वांसाठी निसर्गयात्री संस्था , रत्नागिरी
खालील लिंकवर क्लिक करा आणि गुगल फाँर्म भरा, सबमिट करा.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfXkwBbd-94JnbqraVWIJ0TwWpy6ASCTFjvCi7pMjtyOp2MyQ/viewform