रत्नागिरी, ता. 05 : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 25 जून रोजी क्षेत्रीय स्तरावरील 66 वी डाक अदालत सकाळी ठीक 11 वाजता माननीय पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी येथे आयोजित करण्यात आली आहे. पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवड्यांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. Regional level postal court
देशातील पोस्टाची सेवा ही सामाजिक व आर्थिक जीवनाचा एक अभिन्न भाग आहे. देशातील प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये अपरोक्षपणे पोस्टाच्या सेवेने एक वेगळ्या प्रकारचे स्थान निर्माण करून प्रभावित केले आहे. पोस्टाचे खाते हे लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न करते व ग्राहकांचे जास्तीत जास्त संतोषाधिक्य अथवा समाधान वाढविते. ही सेवा देताना, संभाषणामध्ये / पत्रव्यवहारमध्ये किंवा सेवेमधील काही त्रुटीमुळे असे काही प्रसंग निर्माण होतात, की त्यामुळे पोस्टाच्या सेवेबद्दल तक्रार करण्याची वेळ येते. ह्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्याय निवाडा करण्यासाठी पोस्ट खात्याने वेळोवेळी डाक अदालत घेण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये पोस्टाचे महत्त्वाचे अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्षपणे भेटतात आणि त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करतात. Regional level postal court

विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातात. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. उदा. तारीख व ज्या अधिकार्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, पत्ता इत्यादी. संबंधितांनी डाक सेवेबाबतची आपली तक्रार सहाय्यक डाक निदेशक -1 गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी यांच्या नावे अतिरिक्त प्रतिसह दिनांक 8 जून 2026 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही. Regional level postal court